09 March 2021

News Flash

Coronavirus : नवी मुंबईत आतापर्यंत एकूण ७५० जणांचा करोनामुळे मृत्यू

आज दिवसभरात ४१६ नवे करोनाबाधित, तर चौघांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ३६ हजार पार झाली असून, शहरात आजपर्यंत एकूण ७५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. शहरात  एकूण ३६ हजार ६७३करोनाबधित झाले आहेत. आज शहरात ४१६ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर शहरात आज चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ७५० झाली आहे.

शहरात   ३ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण १,९७,८०५ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर  वाढला आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप वाढत असला तरी देखील, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त निघाली आहे. राज्यभरात आज १८ हजार ३१७ नवे करोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांनी करोनावर मात केली आहे. याचबरोबर आज ४८१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहचली आहे. ज्यामध्ये २ लाख ५९ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ८८ हजार ३२२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३६ हजार ६६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 10:07 pm

Web Title: coronavirus a total of 750 people have died due to coronavirus in navi mumbai so far msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाकाळात बेकायदा ‘इमले’
2 महिलांसाठी ‘एनएमएमटी’ची विशेष सेवा
3 भाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे
Just Now!
X