News Flash

दोन ‘पब’ला पालिकेकडून टाळे

करोना रुग्ण वाढत असताना शहरात पब व बारमध्ये करोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने पालिका व पोलिसांनी कारवाई करीत सीबीडी येथील धमाका आणि एपीएमसीतील नशा या

प्रातिनिधिक छायाचित्र

करोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने कारवाई

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : करोना रुग्ण वाढत असताना शहरात पब व बारमध्ये करोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने पालिका व पोलिसांनी कारवाई करीत सीबीडी येथील धमाका आणि एपीएमसीतील नशा या दोन ‘पब’ला टाळे ठोकले आहेत.

नवी मुंबई पोलिसांकडून शहरात नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम हाती घेतली आहे. यात अमलीपदार्थ विक्रीबरोबर शहरातील पब, बारमध्ये कारवाई करण्यात येत आहे. ६ मार्च रोजी नशा बारमध्ये पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत दोनशेपेक्षा अधिक युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. यात अनेकजण अल्पवयीन होते. यात करोना नियमांचे उल्लंघनही होत होते. सीबीडी येथील धमाका ‘पब’मध्येही असाच प्रकार सुरू होता. मात्र तांत्रिकदृष्टय़ा पोलिसांना कारवाई करता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत लेखी पालिका प्रशासनाला कळविले होते. ही बाब गभीर असल्याने पालिका प्रशासनाने हे दोन्ही पबला टाळे ठाकले आहेत.

नशा व धमाका हे दोन्ही पबला टाळे ठाकले आहेत. करोनाबाबत शासनाची नियमावली पाळणे गरजेचे असून करोना संकटातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे.

-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:21 am

Web Title: coronavirus pandemic ation taken on two pubs dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालिका रुग्णालयांत २४ तास लसीकरण
2 ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात सिडकोकडून समूह विकास
3 घणसोलीत अस्वच्छता
Just Now!
X