04 July 2020

News Flash

करोनामुक्तीचा दिलासा; आठवडाभरात २२०४ पैकी १३४६ जण बरे होऊन घरी

शहरातील  रहिवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील करोनामुक्तीचा दर  आठवडाभरात ४७ टक्क्य़ांवरून ६१ टक्क्यांवर पोचला आहे.

संग्रहित छायाचित्र

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : शहरातील  रहिवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील करोनामुक्तीचा दर  आठवडाभरात ४७ टक्क्य़ांवरून ६१ टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे मागील काही दिवस प्रत्येक दिवशी ५० हून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत.

२० टक्के रुग्ण ५० वयोगटावरील आहेत. शहरात मुंबई शहरात करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या २२००च्या पुढे  पोचली आहे.  शहरात आजवर ७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सुरुवातीला करोनामुळे मृत्यू पावण्याचा दर हा सर्वात कमी म्हणजे २.१८ होता. मात्र, त्यात वाढ होऊन मृत्यूदर हा तीन टक्क्यांपर्यंत   वाढला आहे.  बरे झालेल्यांची संख्याही वाढत आहे. मुक्त झालेल्यांची संख्या १३५०च्या पुढे गेलेली आहे. ज्या भागात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या तुर्भे आणि कोपरखैरणे भागात आहे. नवी मुंबईत असलेल्या  २९ मूळ गावातील दिवाळे, नेरुळ आणि अग्रोळीसह जवळजवळ सर्वच गावात करोनाचा शिरकाव झाला आहे. २० मे रोजी ३९ टक्के असलेला करोनामुक्तीचा दर हा दहा ते १२ दिवसांत ६१ टक्क्य़ांवर गेला.

नवी मुंबईत मागील काही दिवसात शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून प्रलंबित चाचणी अहवाल असलेल्यांची संख्याही कमी होत आहे.केंद्र व राज्य शासनाने अनेक बाबींमध्ये शिथीलता दिली असली तर  नियमांचे पालन करुन पालिकेला सहकार्य केल्यास करोनावर लवकरात लवकर मात करण्याचा प्रय पालिका प्रशासन करत आहे.

अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 7:23 am

Web Title: coronavirus pandemic better news from navi mumbai dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना फैलाव रोखण्यासाठी वैद्यकीय जबाबदाऱ्यांमध्ये बदल
2 मृतदेह अदलाबदलीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा, हलगर्जी करण्यात आल्याचा ठपका
3 करोनाचा कहर : हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट
Just Now!
X