News Flash

रुग्णसंपर्क शोध वेगात

नवी मुंबईत करोना रुग्णांची दैनंदिन संख्या दीडशेच्यावर गेल्याने पालिका प्रशासनाने आता करोना संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन केले आहे.

एका करोना बाधिताच्या संपर्कातील २४ जणांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यातील जवळील संपर्कात आलेल्यांच्या करोना चाचण्या करण्यात येणार असून इतरांना गृहअलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. 

बाधिताच्या संपर्कातील २४ जणांची करोना चाचणी; साखळी तोडण्यासाठी पालिकेचे प्रयत्न

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णांची दैनंदिन संख्या दीडशेच्यावर गेल्याने पालिका प्रशासनाने आता करोना संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन केले आहे. एका करोना बाधिताच्या संपर्कातील २४ जणांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यातील जवळील संपर्कात आलेल्यांच्या करोना चाचण्या करण्यात येणार असून इतरांना गृहअलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या  डिसेंबर, जानेवारीमध्ये कमी झाल्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील फक्त १५ जणांचा शोध घेतला जात होता. मात्र यात वाढ करण्यात येणार असून नागरिकांनीही टाळेबंदी टाळण्यासाठी करोना नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

शहरात करोनाचे दैनंदिन रुग्ण जानेवारीमध्ये ५० पेक्षा खाली आले होते. १ फेब्रुवारीपासून सर्वासाठी लोकल सुरू झाली आणि दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत गेली. आता दैनंदिन रुग्णांची संख्या १५० पर्यंत गेली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांत वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड हजाराच्या घरात जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जास्ती जास्त संशयितांच्या चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे.

डिसेंबर व जानेवारीमध्ये करोनाबाधिताच्या संपर्कातील १५ व्यक्तींची शोध घेत पालिका त्यांची तपासणी करीत होती. आता रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची तत्काळ करोना चाचणी तर लांबच्या संपर्कातील व्यक्तींचे गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एका रुग्णामागे २४ संपर्कातील रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

गृह अलगीकरणातील संशयित घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढली तरी चालेल, परंतु करोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने मोठी पावले उचलली आहेत.

करोनाबाधितांची संख्या ५५ हजारांच्या पुढे, तर मृतांची संख्याही ११००च्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात नागरिक पुन्हा विनामास्क फिरताना दिसत असून हे स्वत:बरोबरच सर्वासाठी धोक्याची घंटा आहे.त्यामुळेच पालिकेने पुन्हा कडक नियमावली करून कारवाईला सुरुवात केली आहे.

२५० डॉक्टरांची भरती?

रुग्ण वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टर व परिचारिका व इतर पदांची नेमणूक केली होती. रुग्ण कमी झाल्याने त्यांना कमी करण्यात आले होते. आता पुन्हा आरोग्यकर्मीची गरज भासणार असून आवश्यकतेनुसार प्रतीक्षा यादीत असलेल्यापैकी २५० जणांची नियुक्ती करण्याचे नियोजन असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

करोना रुग्णाच्या संपर्कातील कमीत कमी २० तर जास्तीत जास्त २४ जणांचा शोध घेण्यात येत आहे. जवळील संपर्कातील व्यक्तींना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांनी पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

१५३ नवे बाधित

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या वाढली असून  मंगळवारी १५३  नवे करोनाबाधित आढळले  तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या  ५५,८१८  इतकी झाली आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९६ टक्के  असून सोमवारी ९९ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५२,२९३  जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधिन रुग्ण १,४०२  इतके आहेत. तर एकूण मृत्यू  झालेल्यांची संख्या ११२३  इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 12:43 am

Web Title: coronavirus patients contact to other person search speed increased dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सात खासगी केंद्रांवर आजपासून लसीकरण
2 पालिका शहरात ३६ विद्युत चार्जिग केंद्रे उभारणार
3 केंद्रीय स्वच्छता पथकाच्या आता अचानक भेटी
Just Now!
X