07 July 2020

News Flash

Coronavirus : रुग्णवाढीचा वेग चिंताजनक

कोपरखैरणे, तुर्भेमधील रुग्णसंख्या हजारच्या आसपास; नेरुळ, ऐरोलीतील बाधित ८०० नजीक

कोपरखैरणे, तुर्भेमधील रुग्णसंख्या हजारच्या आसपास; नेरुळ, ऐरोलीतील बाधित ८०० नजीक

नवी मुंबई : नवी मुंबईत दिघा नोड वगळता करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जूनच्या आरंभीस हा फैलाव वेगाने झाला आहे. यात सर्वाधिक बाधित हे कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरांत आहेत. दोन्ही विभागांतील आकडा एक हजारच्या आसपास पोहोचला आहे. सध्या कोपरखैरणे, नेरुळ आणि घणसोलीत रुग्णांचा आकडा अधिक आहे. या तिन्ही विभागांत एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात रुग्ण आढळले. त्यानंतर वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संसर्ग झाला. त्यामुळे तुर्भे आणि कोपरखैरणे नोडमध्ये रुग्णांची संख्या वाढत गेली.

तपासणीचा वेग वाढल्याने ही रुग्णसंख्या दिसत आहे. शहरातील रुग्णसंख्या २५ दिवसांत दुप्पट झाली आहे. त्याविरोधात ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी सूचनांचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

तीन महिन्यांत ७०० रुग्ण, २४ तासांत ८४ रुग्ण!

करोना प्रादुर्भाव झाल्याच्या दिवसापासून ऐरोली नोडमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात होती. मे महिन्याच्या अखेरीस या परिसरातील रुग्णसंख्या १५०च्या आसपास होती. त्यानंतर १ जून ते २३ जून या कालावधीत या परिसरातील रुग्णसंख्या ७०० च्या आसपास पोहोचली होती. २४ जून रोजी या भागात सर्वाधिक ८४ रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीतील आजची रुग्णसंख्या ८०० इतकी आहे.

कोपरखैरणेतील वाढीची कारणे

* कोपरखैरणे सेक्टर-१९ सीमध्ये १ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. बुधवारी (२४ जून) एकाच दिवशी सहा रुग्ण आढळले. १ एप्रिल ते २४ जूनपर्यंत रुग्णवाढीचा कालावधी १५ ते १६ दिवस असा होता.

* वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारातून करोनाचा प्रसार झाल्याचे बोलले जात आहे. टाळेबंदीत ‘एपीएमसी’ हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ते बंद करण्यात आले नव्हते. बाजाराच्या आवारात जाणारे कर्मचारी आणि माथाडी कामगार हे तुर्भे आणि कोपरखैरणे भागांत राहतात.

* घणसोलीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम राहलेला आहे.  बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सचिव पातळीवर घेतला जातो. त्यात पालिकेचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे तुर्भे, कोपरखैरणे आणि घणसोलीतील रुग्णसंख्यावाढीचा अंदाज पालिकेला आला नाही.

कुठे, कधी?

नोड           करोना पहिला रुग्ण

वाशी              १३ मार्च

ऐरोली           २२ मार्च /

बेलापूर            २९ मार्च /

कोपरखैरणे      १ एप्रिल

नेरुळ               २ एप्रिल

घणसोली         ५ एप्रिल

तुर्भे                १७ एप्रिल

दिघा             १९ एप्रिल

यात घणसोलीव्यतिरिक्त सर्वत्र पहिल्यांदा पुरुषांमध्ये संसर्ग (सद्य:स्थिती २४ जूनपर्यंत)

 

नोड                     बाधित           मृत्यू         कोरोनामुक्त     उपचार सुरू

बेलापूर                 ४१३               १७                   २०३               १९३

नेरुळ                   ७९५               २१                   ४७३               ३०१

वाशी                     ५६०              १७                  ३३७                २०६

तुर्भे                      ९६७              ४५                  ८८६                २३६

कोपरखैरणे           ९७४               ३३                   ५४१               ४००

घणसोली                ६६०             १८                 ३२६                 ३१६

ऐरोली                   ७७८             १९                  ३८४                  ३७५

दिघा                    २४७               १०                 १३६                  १००

एकूण                 ५३९३              १८०                 ३०८६            २१२७

 

२३६  रुग्णांची  गुरुवारी एकाच दिवसात नव्याने भर पडली. तर  ९ जण दगावले असून मृतांचा आकडा १८९ झाला आहे.  एकाच दिवसात  १०२ जण करोनामुक्त झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 1:06 am

Web Title: coronavirus patients rapidly increasing in navi mumbai area zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 लवकरच नोडनिहाय टाळेबंदी
2 ऑनलाइन आकलनात ‘विशेष’ प्रगती
3 नवी मुंबईचे आयुक्त मिसाळ यांना अभय?
Just Now!
X