मृत्यूदर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांकडून रोज कारणमीमांसा, उपचारांसाठी उपाययोजना

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईतील १ जुलैपर्यंतचा मृत्यूदर हा ३.२६ होता. त्यात घट होऊन तो २.६४ पर्यंत खाली आला आहे.  शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक मृत्यूबाबतची सखोल माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने घेतली जात आहे. त्याआधारे मृत्यूचे कारण, रुग्णाची शारीरिक क्षमता, दुर्धर आजार आणि इतर बाबी बारकाईने तपासल्या जात आहेत. यासाठी रोज सायंकाळी सात वाजता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना करोनाने मृत्यू झालेल्यांची आणि त्यांच्यावरील उपचाराची माहिती आयुक्तांना द्यावी लागत आहे.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली तरी चालेल. परंतु, मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पालिका यंत्रणा काम करील, असे स्पष्ट केले होते.

१ जुलै रोजी बाधितांची संख्या ६,८२३ होती, तर मृतांची संख्या २२३ होते. राज्य शासनाने ८ जूननंतर ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर शहरात विविध ठिकाणी अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे संसर्गात वाढ झाली. दिवसाकाठी सरासरी २५० ते ३५०च्या जवळपास नवे रुग्ण आढळू लागले. त्यात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत करोनामुळे एकूण ९६ मृत्यू होते. तर १ जुलैपर्यंत एकूण मृतांची संख्या २२३ झाली होती.

आजवरचा मृत्यूदर

* ९ जूनपर्यंतचा मृत्यूदर : ३. १३ टक्के

* ९ जुलैपर्यंतचा मृत्यूदर : ३.२६ टक्के

* ३ ऑगस्ट पर्यंतचा मृत्यूदर : २.६४ टक्के

समन्वय आणि अद्ययावत पद्धती

* खासगी आणि पालिका रुग्णालयातील प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा आणि अहवाल आयुक्तांना प्रत्यक्ष विभाग अधिकाऱ्यांकडून सादर केला जात आहे.

ल्ल मृत्यू झालेल्या व्यक्तीवरील उपचार कधी, कोठे आणि कसे करण्यात आले. याशिवाय औषधोपचारांबाबतची माहिती.

* उपचारपद्धतीबाबत समन्वयात अद्ययावत पद्धतीचा अवलंब. त्यामुळे मृत्यूचे कारण कळण्यास मदत. त्यामुळे पालिका यंत्रणा सजग