05 December 2020

News Flash

रेल्वे स्थानकांबाहेर करोना चाचणी केंद्रे

नवी मुंबई पालिका प्रशासनाचे नियोजन

नवी मुंबई पालिका प्रशासनाचे नियोजन

नवी मुंबई : आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी असलेली लोकल हळूहळू सर्वासाठी खुली होत आहे. बुधवारपासून महिलांसाठी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लवकरच इतरांनाही प्रवास खुला होईल. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने नियोजन केले आहे. लोकल सर्वासाठी खुली होताच सर्व रेल्वेस्थानकांबाहेर करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणारअसल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

सर्वासाठी लोकल सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील एका नेत्याने दिले आहे. नवी मुंबई हे मुंबई शेजारील महत्त्वाचे शहर असून या शहरात मुंबईतून व ठाण्यातून हजारो प्रवासी येत असतात. लोकल सुरू होताच शहरातील वर्दळीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सध्या नियंत्रणात येत असलेली करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रत्येक रेल्वेस्थानक परिसरात करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स दारावे, बेलापूर ही रेल्वेस्थानके तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे , ऐरोली या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या परिसरात करोना चाचणी केंद्र होणार आहेत. या केंद्रावर ‘आरटीपीसीआर’ तसेच प्रतिजन चाचण्या करण्याची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. करोनाची आटोक्यात येणारी रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध केले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.  इतर शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

करोना रुग्णस्थिती

४२,६२६             रुग्णसंख्या

२६९१                उपचाराधीन रुग्ण

३९,०७४             करोनामुक्त रुग्ण

९१.६७               करोनामुक्तीचा दर

८६१                  एकूण मृत्यू

२.०२%             मृत्युदर

१२७                 दिवस करोना दुपटीचा काळ

(४ महिन्यांपेक्षा अधिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 2:02 am

Web Title: covid 19 test centers outside railway stations zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 पाच पोलिसांना करोनाचा पुन्हा संसर्ग
2 थेट रुग्ण संवादाने काळजी केंद्रातील समस्यांचा उलगडा
3 नवी मुंबईवर लवकरच सीसीटीव्हीं कॅमेऱ्यांची नजर
Just Now!
X