News Flash

रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्याची जबाबदारी कोविड रुग्णालयांचीच

आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबई पालिका आयुक्तांचे विशेष आदेश

नवी मुंबई : गंभीर लक्षणे असणाऱ्या करोनाबाधितांवरील उपचारांमध्ये लाभदायक ठरणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा दूर करून त्याची गरज असणाऱ्या रुग्णांना योग्य वेळेत व योग्य दराने त्याचा पुरवठा व्हावा याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याचे नियोजन महाराष्ट्र शासनामार्फत केले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करणारी महानगरपालिकेची व खासगी कोविड काळजी केंद्र आणि कोविड रुग्णालय  यांची सूची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून, कोणत्याही रुग्णालयाने इंजेक्शन मागणीची औषध चिठ्ठी रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ  नये असे पालिका आयु्क्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई शहरातील सर्व कोविड रुग्णालयांना आदेशित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:06 am

Web Title: covid hospitals are responsible for providing remedicivir injections akp 94
Next Stories
1 पनवेलमध्ये २०६३ करोनाबळींवर अंत्यसंस्कार
2 रुग्णसंख्या घटली पण…मृत्यूंची चिंता
3 पालिकेच्या वाशी रुग्णालयात रक्तद्रव पेढी
Just Now!
X