नवी मुंबई : पनवेल येथील एका सोन्याच्या पेढीवरून झळाळी देऊन सोने घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले. त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून अंदाजे  ६५ लाख रुपयांचे सोने घऊन दोन चोरटे पसार झाले आहेत. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

पनवेलमध्ये भर बाजारात बंदुकीचा धाक दाखवत हल्ला करीत हा दरोडा टाकण्यात आला. यात सुमारे ६५ लाखांचे अकराशे ग्रॅमपेक्षा जास्त सोने असलेली पिशवी घेऊन दरोडेखोर फरार झाले आहेत.

पनवेल शहरातील जोशी आळीतील गोकुळ गोल्ड सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर रावसाहेब कोळेकर यांचे सोन्याच्या दागिन्यांना झळाळी (पॉलिश) करून देण्याचे दुकान आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील व्यापारी दीपेश जैन हे पनवेलमधील जोशी आळी येथील रावसाहेब कोळेकर यांच्याकडे आले होते. जैन हे दुकानातील सोने घेऊन पिशवीत भरून खाली उतरत असताना दोन अज्ञात चोरट्यांनीत्याच्या डोक्यात

पिस्तुलाचा दस्ता मारून सोन्याची पिशवी हिसकावून घेतली. दुचाकीवरून ते दोघे पळून गेले.