News Flash

प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

आरोपींची ओळख पटल्यावर खबरींच्या माध्यमातून आरोपींचा  शोध लागला.

न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत कारागृहात रवानगी करण्यात आली.

नवी मुंबई : धावत्या लोकमधून प्रवाशांची लूट करणाऱ्या दोघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी एका प्रवाशाचे पाकीट चोरी केले होते. सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपी सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल शिंदे आणि शाहरुख सोहेल अन्सारी असे अटक आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे बैंगनवाडी गोवंडी येथे राहतात. यातील फिर्यादी सूरज देसाई हे ६ जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या लोकलने कुर्ला ते पनवेल प्रवास करीत होते. गोवंडी स्थानक येत असताना त्यांच्याजवळ दोन इसम येऊन उभे राहिले. स्थानकावरून गाडी सुटताच त्यांनी झटापट करीत देसाई यांच्या खिशातील पाकीट जबरीने काढून लोकलमधून उतरून पळ काढला. याबाबत देसाई यांनी वाशी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली होती. वाशी रेल्वे पोलिसांनी कुर्ला आणि गोवंडी या दोन्ही स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण तपासणी केली असता आरोपी कुर्ला येथे लोकलमध्ये चढताना आणि गोवंडी येथे घाईने उतरून पळून जाताना आढळून आले. फिर्यादी सूरज यांनीही सदर आरोपींना ओळखले.

आरोपींची ओळख पटल्यावर खबरींच्या माध्यमातून आरोपींचा  शोध लागला. ते बैंगनवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली  असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  ए. सी.  आढाव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही आरोपींना सापळा रचून अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:12 am

Web Title: crime news two arrested for robbing passengers akp 94
Next Stories
1 ऑनलाइन शिक्षणही बंदच
2 बनावट उत्पादनाची विक्री करणाऱ्यास अटक
3 मॅट्रिमोनिअल साईटवरुन १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून लैंगिक शोषण; भामट्याला मुंबईत अटक
Just Now!
X