नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयाजवळ बेलापूर खाडीत पुन्हा एकदा मगर आढळून आल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे ठाणे प्रादेशिक पथक आल्यानंतर मगरीचा बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती वन विभागाने दिली. याआधी ऑगस्ट महिन्यात मगर आढळून आली होती.

मगरीला पकडून तिचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कुठलीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता पुन्हा ही मगर आढळली आहे. ही मगर गोडय़ा पण्यात आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.  घटनास्थळी पाहणी केली असून गुरुवारी ठाणे प्रादेशिकचे पथक तिला पकडण्यासाठी मोहीम हाती घेईल असे वनपालपांडुरंग गायकवाड यांनी सांगितले.