उद्योजक : सी. व्ही. साटम, ‘एल्गिन प्रोसेस इक्विपमेंट प्रा. लि.’

रसायने, पेट्रोकेमिकल, अणुऊर्जा, औष्णिक ऊर्जा, औषधनिर्मिती, फायबर उद्योगासाठी आवश्यक असणारे ड्रायर, फ्लॅश ड्रॉइंग, गॅस ड्रायर, लिक्विड ड्रायर,  बनविण्याचे काम राबाळे येथील उद्योजक सी. व्ही. साटम यांची ‘एल्गिन प्रोसेस इक्विपमेंट प्रा. लि.’ २९ वर्षे करत आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, टाटा इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी, इंजिनीर्स इंडिया लिमिटेड सारख्या ३२ बडय़ा कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम करत आहे. भारताच्या गंगा, गोदावरी, गोमती या युद्ध नौकांसाठी लागणारे तंत्रज्ञान विशेषत: नौका थांबवण्यासाठी लागणारे स्टेबल आणि चालविण्यासाठी लागणारे स्टीअररिंग बनविण्यात साटम यांच्या कंपनीने दाखवलेल्या कौशल्याबद्दल त्यांना भारताचे माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती याच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

वाचन आणि संगीत ऐकण्याचा छंद असलेले ७० वर्षीय साटम यांच्या कंपनीने ड्रायर निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले आहे. मरोळ, अंधेरी येथे राहणाऱ्या साटम कुटुंबाची आर्थिक स्तिथी तशी बेताचीच होती. वडील रेल्वेत कारकून होते तर आई गृहिणी. तीन भाऊ  आणि एक बहीण यामुळे वडिलांचा पगार कमीच पडत होता. लहानपणापासून कमवा आणि शिका हा आदर्श घेऊन साटम यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर व्हीजेटीआय मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली. ७०च्या दशकात शैक्षणिक पात्रता असणाऱ्या तरुणांना नोकऱ्या लवकर मिळत. साटम यांना त्या वेळी प्रसिद्ध असलेल्या वालचंद समूहात नोकरी मिळाली. त्या वेळी प्रसिद्ध शात्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी अणुतंत्रज्ञान भारताने कॅनडाकडून आयात केले होते. एक-दीड वर्ष वालचंदमध्ये काम केल्यानंतर साटम जी. आर. इंजिनीअरिंगमध्ये नोकरी करू लागले. त्याचवेळी टाटा कन्सल्टन्सीने आण्विक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम सुरू केले होते. कोणतीही मुलाखत न घेता ज्या चार-पाच अभियंत्यांना सेवेत घेण्यात आले त्यात साटम यांचा समावेश होता.

साटम यांच्या सक्षमतेची एव्हाना उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे त्यांना विविध ठिकाणांहून नोकरीसाठी विचारणा होत होती. ते टाटामध्ये नोकरी करत असतानाच, पोखरण अणुस्फोट करण्यात आला. त्या वेळी विकसित देशांनी भारतावर निर्बंध घातले.

नवनवीन विषयांवर जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या साटम यांनी रसायनांशी संबंधित उद्योगांचा अभ्यास सुरू केला. त्यासाठीची यंत्रसामग्री बनविण्याचे तंत्रज्ञान अवगत केले आणि नंतर सायमन लॉइड स्टील कंपनीत या क्षेत्रातील अनुभव मिळवला. त्या वेळी सर्वाधिक म्हणजेच ४३ हजार रुपये पगार घेणारे ते एकमेव मराठी अभियंते होते. त्या काळातील संशोधना मुळे साटम यांना पाच सुवर्णपदके मिळाली. माजी उपराष्ट्रपती जत्ती आणि पंजाबचे माजी राज्यपाल मनमोहन च. धरी यांच्या हस्ते ही पदके प्रदान करण्यात आली.

नोकरी करून अनुभवांची शिदोरी गाठीला बांधण्यासाठी साटम यांनी एप्रिल १९८८ मध्ये कुर्ला येथील एका मित्राच्या घराच्या गॅलरीत स्वतचे कार्यालय सुरू केले. तिथेच त्यांनी ‘एल्गिन कंपनी’ची स्थापना केली. त्या वेळी रिलायन्स, रियॉन यू बी पेट्रो यांसारख्या कंपन्यांची कामे त्यांना मिळाली. ही कामे ते मित्रमंडळींच्या कारखान्यांतून करून घेत. नंतर त्यांनी रबाळे आर ३२३ ही मद्रास कॅफे यांची कंपनी १५ लाखांना विकत घेतली. स्वत:च उद्योग करून साटम यांनी १५ लाख रुपये उभे केले.

हा उद्योग सुरू करताना त्यांच्या हातात केवळ पाच हजार रुपये होते. अनेक बडय़ा रासायनिक औषधनिर्मिती कंपन्यांना त्याचे प्रकल्प उभे करून देण्याचे काम साटम यांची ‘एल्गिन कंपनी’ करते. यात एअर ड्रायर, बायो डिझेल प्लांट, फ्लॅश ड्रायर, गॅस ड्रायर, हिट रिकव्हरी युनिट, लिक्विड ड्रायर, ऑरगॅनिक वेपर युनिट, असे १७ प्लांट उभारले जात आहेत. लातूर रोड वरील महानंदा डेअरीचा ३५ टन दूध चार-पाच तासांत गरम करण्यासाठी लावण्यात आलेला सोलर हिटर प्लांट साटम यांच्या कंपनीने लावला आहे.

प्रशिक्षणासाठी प्रयत्न

सूर्यप्रकाश नसताना मिठावर पाणी गरम करण्याची यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. साटम मुंबई विद्यपीठचे परीक्षक आहेत. आपल्या ज्ञानाच वापर सर्वाना व्हावा यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यात प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षण केंद्रात ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.