05 December 2020

News Flash

परदेशी कांद्याला मागणी

३५ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर

(संग्रहित छायाचित्र)

देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू करून आयातीला परवानगी दिल्याने इराण, तुर्कस्थान, अफगाणिस्तान, इजिप्त या देशांतून सध्या घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. देशी कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने परदेशी कांद्याला मोठी मागणी आहे.

तुर्भे येथील ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात ५० टन कांदा दाखल झाला असून, ३५ ते ५५ रुपये किलो असा त्याचा दर आहे.

अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके शेतातच खराब झाल्याने कांद्याची आवक घटली आहे. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे सरकारने निर्यात बंदी करून कांदा देशाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तसेच आयातीला परवानगी देऊन तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

देशी आणि परदेशी कांदा चवीला, तसेच आकाराला जवळपास सारखाच असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीला उतरला असून, त्याचे दर आवाक्यात आहेत. ३५ ते ५५ रुपयांपर्यंत हा कांदा विकला जात आहे.

परदेशी कांदा बाजारात येऊ लागल्याने देशी कांद्याचे दरही आवाक्यात आले आहेत. ९० पार केलेल्या कांद्याचे दर सध्या ५५ ते ७० रुपये इतके आहेत.

असाही जुगार..

कांद्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी तुर्कस्थान, अफगाणिस्तान, इजिप्त, इराण या देशांतून कांदा आयात केला जात आहे. यात आयात-निर्यात क्षेत्रातील मोठय़ा व्यापाऱ्यांचे मात्र फावले आहे. ज्या राज्यांत काद्यांचा तुटवडा आहे, तेथे दर अधिक मिळत असल्याने त्यांनी आपला मोर्चा अशा राज्यांकडे वळविला आहे. यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांचा समावेश आहे. हे निर्यातदार एखाद्या राज्यात तुटवडा निर्माण होण्याची वाट पाहात असल्याचे कांदा व्यापारी व संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले. देशात सध्या कांद्याचा जुगार चालू आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:22 am

Web Title: demand for foreign onions is rs 35 to 55 per kg abn 97
Next Stories
1 श्वास कोंडतोय!
2 अपघात रोखण्यासाठी पालिकेचा पुढाकार
3 दोन वर्षांत एकही हप्ता न भरणाऱ्यांचे घर रद्द होणार
Just Now!
X