07 April 2020

News Flash

दिघ्याला २४ तास पाणी कधी?

इंग्रजांच्या काळातील रेल्वेचे धरण उशाशी असताना दिघ्यात सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे.

|| शेखर हंप्रस

मूलभूत सुविधांची वानवा

नवी मुंबई : बेकायदा बांधकामांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला दिघा परिसर आजही सुनियोजित नवी मुंबईतील सुविधांपासून दूर असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत इतर उपनगरांत २४ तास पाणीपुरवठा होत असताना या परिसरात आठवडय़ातून दोन ते अडीच दिवस निर्जळी असते. उरलेल्या दिवसांत पाणी येते, मात्र तेही कमी दाबाने. इतरही अनेक मूलभूत सुविधांचा बोजवारा या ठिकाणी उडालेला आहे.

इंग्रजांच्या काळातील रेल्वेचे धरण उशाशी असताना दिघ्यात सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. हे धरण हस्तांतरण करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे धरण उशाला असतानाही या परिसरात पाणीटंचाई ही गंभीर समस्या आहे. नवी मुंबईत २४ तास पाणी असले तरी  दिघा विभागाला दोन ते चार तास पाणी मिळते.

एमआयडीसी पाणीपरवठा करीत असल्याने शुक्रवारी पाणी यंत नाही. शुक्रवारी पाणी सोडण्यात येत नसल्याने गुरुवारीच पाणी बंद करण्यात येते. त्यामुळे गुरुवारी संध्यकाळीही पाणी येत नाही. शनिवारी पाणी येईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे आठवडय़ातील अडीच दिवस दिघ्यात निर्जळी असते. त्यामुळे पालिकेत येथील लोकप्रतिनिधी वारंवार पाणी समस्या मांडत असतात. पालिका प्रशासनाकडून त्यांना अश्वासनही दिली जातात. मात्र आजपर्यंत ही समस्या सुटलेली नाही, उलट ती गंभीर होत असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. इतर उपनगरांना २४ तास पाणी मिळते; मग आमचेच पाणीहाल का, असा सवाल ते करीत आहेत. पालिकेने मोरबे धरणाचे पाणी दिघ्यापर्यंत नेण्यासाठी कामला सुरुवात केली आहे, मात्र काही जलवाहिनीचे काम थांबलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार, पक्ष आश्वासनांची जंत्री मतदारांपर्यंत येतात, परंतु पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत दिली गेलेली किती आश्वासने पूर्ण झाली? कोणते प्रभाग अद्याप सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत? आपल्या प्रभागाच्या विकासाबद्दल मतदारांना काय वाटते? या साऱ्याचा लेखाजोखा मांडणारी वृत्तमालिका आजपासून..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:03 am

Web Title: digha twenty four hour water supply akp 94
Next Stories
1 ‘यूटय़ूब’वरील प्रात्यक्षिकांवरून २२ बंदुकांची निर्मिती
2 ना उद्यान; ना मैदान!
3 ऐरोलीत सिडकोचा गृहप्रकल्प
Just Now!
X