सहा महिन्यांत किमतीत दुप्पट वाढ

नवी मुंबई</strong> : खाद्यतेलांच्या किमती मागील सहा महिन्यांत गगनाला भिडल्या आहेत. ७० ते ८० टक्क्याने तेलांच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या वाढलेल्या किमतींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील तेलाच्या फोडणीलाही महागाईचा फटका बसला आहे. थोडक्यात ९० रुपये किलोने मिळणारे तेल आता दुप्पट दराने विकत घ्यावे लागत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात- निर्यात शुल्क, परदेशात कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, करोनाचे संकट यामुळे सर्वाधिक आयात या विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या असून किरकोळ बाजारात या किमतीत २० टक्क्याने आणखी वाढ होत आहे. त्यामुळे तेल २०० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर काही शहरात तर शंभर रुपये झाले आहेत. प्रत्येक अन्नपदार्थाच्या फोडणीसाठी स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलांच्या किमंतीतही दिवाळीनंतर कमालीची वाढ झाली आहे.

९० ते १०० रुपये किलोने मिळणारे खाद्यतेल आता थेट १५० ते १८०

रुपये किलोने घाऊक बाजारात विकले जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते ही दरवाढ ७० ते ८० टक्के आहे. मागील शंभर वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात कधीही दरवाढ झालेली नाही असे एपीएमसीमधील तेल व्यापाऱ्यांनी सांगितले.

भारतात ७० टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केले जात असून केवळ ३० टक्के तेल देशातील वापरले जात आहे. त्यामुळे खाद्यतेलासाठी भारत हा मलेशिया, अर्जेटिना, युक्रेन, ब्राझील या देशांवर अवलंबून आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, तेल निर्यात करणाऱ्या व आयात करणाऱ्या भारताने निर्यात शुल्क वाढविल्याने, रशियात झालेले सूर्यफुलाचे कमी उत्पादन, अर्जेटिनामधील कामगारांचा प्रश्न आणि करोनाचे विश्व संकट यामुळे खाद्यतेलाच्या किमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत.

तरुण जैन (तेल व्यापारी), सचिव, आखिल भारतीय खाद्यतेल संघ

खाद्यतेलाच्या घाऊक बाजारातील किमती

* पामतेल  :  १२० ते १२५ रुपये

* सोयाबीन :   १२५ ते  १३०

* कॉटन्सीड :    १२५ ते १३०

* राईस ब्रॅन्ड : १३५ ते १४०

* सन प्लॉवर :  १४५ते १५५

* शेंगतेल :  १६५ ते १७०

* करडी :  सफोल १८० ते १९०