29 March 2020

News Flash

नवी मुंबईतील सर्व पादचारी पुलांना आता उद्वाहन

नेरुळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे उद्घाटन

नेरुळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वच पादचारी पुलांना उद्वाहक (इलेव्हेटर) बसविण्याची घोषणा खासदार राजन विचारे यांनी रविवारी येथे केली. सर्वसामान्य नागरिक तसेच ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेरुळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकादरम्यान उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचा वापर नागरिकांनी सुरू केला. त्यानंतर या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, नगरसेविका सुनीता मांडवे आणि माजी नगरसेवक रतन मांडवे या वेळी उपस्थित होते.

नेरुळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे, सिडको व महापालिका यांच्यातील चर्चेत रखडले होते. पादचारी पूल धोकादायक स्थितीत असल्याने तो कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबत स्थानिक नगरसेविका सुनीता मांडवे यांनी पालिकेत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर पालिकेने पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला होता. सिडकोने रेल्वेकडून या पुलाची देखभाल दुरुस्ती करून घेतली आहे. यासाठी सुमारे ३३ लाख रुपये खर्च आला आहे. जुन्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या कालावधीत नागरिकांना पायपीट करावी लागत होती.

नेरुळमधील पादचारी पुलामुळे नागरिकांची मोठी सोय झाली. येत्या काळात नवी मुंबईत असलेल्या प्रत्येक रेल्वे पादचारी पुलावर जाण्यासाठी उद्वाहकाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

-राजन विचारे, खासदार ठाणे लोकसभा मतदारसंघ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:40 am

Web Title: elevators to all pedestrian bridges in navi mumbai zws 70
Next Stories
1 मोरबे गावात ३० श्वानांचा मृत्यू
2 पामबीचवर पथदिव्याचा खांब कोसळला
3 अर्थसंकल्पात घोषणांची जंत्री
Just Now!
X