सीमा भोईर

महामुंबईत सिडकोचे अनेक भूखंड मोकळे असून त्यावर अतिक्रमण होत आहे. अनेक ठिकाणी झोपडय़ा बांधल्या जात आहेत. कळंबोली सेक्टर १४ व ८ मधील मोकळ्या भूखंडावर शंभरएक झोपडय़ा बांधल्या आहेत, याकडे प्रशसनाचे दुर्लक्ष होत आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

कोपरखरणे स्टेशन परिसरातील एका भूखंडावरही असेच अतिक्रमण झाले असून ते काढण्यासाठी गेले असता पथकावरच दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या झोपडय़ा हटविल्या, मात्र काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी झोपडय़ा झाल्या. असाच प्रकार इतर भूखंडांवरही होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

‘सदर जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये, तसे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल’, असा फलक  सिडकोने लावला आहे. मात्र आपणच लिहिलेल्या फलकाकडे व जागेकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामध्ये झोपडीदादांचा हात असू शकतो, असाही अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. काहीजण या झोपडय़ा बांधून त्या भाडय़ाने देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी झोपडय़ांव्यतिरिक्त मटण, चिकनची दुकाने व इतर व्यवसायही सुरू आहेत. एवढे सर्व सुरू असताना सिडकोच्या नजरेस कसे पडू शकत नाही, असा सवाल केला जात आहे.

स्थानिकांनी वाढीव बांधकाम केले तर लगेच कारवाई होते. मात्र सिडकोच्या जागेत बांधलेल्या या झोपडय़ांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

-तुषार पाटील, रहिवासी

सिडको कोणालाही अभय देत नाही. मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटविण्याच्या सूचना सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला देण्यात येतील.

-गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता सिडको