फेसबुकवरून मैत्री करीत आमिष दाखवत नेरुळ येथील एका महिलेची २४ लाख १८ हजारांची फसवणूक झाली आहे. अलेक्स ओमर आणि एन सॅमी या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२०१८ मध्ये फिर्यादी महिलेची अलेक्स याच्याशी फेसबुकवरून मैत्री झाली. कालांतराने एन. सॅमी या महिलेशीही तिची आशीच ओळख झाली. हे दोघेही दिल्ली कस्टम विभागात काम करीत असल्याचे भासवले होते. कस्टममधून स्वस्त वस्तू देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र त्यासाठी कस्टम डय़ुटी भरणे गरजेचे आहे असे सांगितले.

मागणीनुसार विविध खात्यात २४ लाख १८ हजारांची रक्कम फिर्यादी महिलेने भरली. मात्र भेटवस्तू तर आलीच, शिवाय अजून पैसे भरा म्हणून तगादा लावण्यात आला. पुढे आरोपींनी संपर्क बंद केला. त्यामुळे काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.