News Flash

कामोठय़ातून भोंदूबाबाला अटक

भोंदूबाबाला चित्ता कॅम्प, मुंबई येथून कामोठे पोलिसांनी अटक केली.

पाच हजार रुपये खर्च करा, संतती जन्माला येईल अशी बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाला चित्ता कॅम्प, मुंबई येथून कामोठे पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या भोंदूबाबाला ताब्यात घेण्यात आले आहे. मेलवेल मन्नील्यम अर्जन ऊर्फ वीरप्पन बाबा (रा. ट्रॉम्बे, चेंबूर) असे अटकेत असणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेला तिचे सासू-सासरे दोन वर्षांपूर्वी वीरप्पनकडे मुलगा होत नाही म्हणून घेऊन गेले होते. मात्र वेळोवेळी पीडितेला वीरप्पन बाबा संतती होण्यासाठी संपर्क साधून स्वत:शी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता. तसेच पीडितेने सासू-सासऱ्यांविरोधात छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणातील सासू-सासरे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. इतरांना संततीचा प्रसाद देणारा वीरप्पन पत्र्याच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांना अटक करताना आढळले. सध्या हा भोंदूबाबा १९ तारखेपर्यंत चौकशीसाठी कामोठे पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 12:01 am

Web Title: fake godman arrested from kamothe
Next Stories
1 पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण
2 वर्षअखेरीच्या रात्री पोलिसांची करडी नजर
3 ‘पाम बीच’ अडवून खेळ करणाऱ्या संस्थांना विरोध
Just Now!
X