News Flash

बनावट बियाणे विकून गंडा घालणारी टोळी उद्ध्वस्त

७ जानेवारी रोजी या प्रकरणातील दोघांना वाशी येथून मुद्देमालासह अटक केली होती.

बनावट बियाणे विकणाऱ्या नायजेरियन टोळीने आजवर विविध राज्यांमधील २८ जणांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.  खांदेश्वर पोलिसांनी या टोळीतील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे.

७ जानेवारी रोजी या प्रकरणातील दोघांना वाशी येथून मुद्देमालासह अटक केली होती.  टोळीचा म्होरक्या खारघर येथील त्याच्या घरातून काम करीत होता. यात एका महिलेचा समावेश होता.  त्यांच्याकडून ३२ मोबाईल आणि २८ सीमकार्ड सापडले आहेत.

या टोळीने फेसबुकवरून सांगली येथील अमरसिंह  सूर्यवंशी यांची फसवणूक केली होती. कॅथरीन डोयल नावाच्या व्यक्तीशी सूर्यवंशी यांची ओळख झाली होती. या वेळी कॅथरीनने कोमासीड्स हे आयुर्वेदीक औषधांसाठी वापरण्यात येणारा घटक असल्याचे सांगितले आणि त्याचे उत्पादन केल्यास मोठय़ा प्रमाणावर आर्थिक लाभ होऊ शकतो, असे सांगितले. परंतु  व्यवहरातील काही त्रुटींच्या आधारावर सूर्यवंशी यांनी पोलिसांना माहिती दिली. या वेळी सापळा रचून पोलिसांनी साडेसहा लाख रुपये किमतीचे बियाणे जप्त केले.

पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या पथकातील  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी तपास करून टोळीतील रुथ सॅमवेल हिचा शोध घेतला. ती खारघर सेक्टर ३६ मधील  एका अलिशान घरात राहते. तिने एका नायजेरीयन नागरिकाशी विवाह केला आहे. सूर्यवंशी यांना कोमासीड्स म्हणून आंब्याच्या बिया (कोय) साडेसहा लाखांना देण्याचा त्यांचा डाव होता.

सात फूट उंची, १२० किलो वजन

या टोळीचा मुख्य सूत्रधार किंग्ज ग्ले हा सात फूट उंचीचा आणि  वजन सुमारे १२० किलो आहे.  त्यामुळे त्याला अटक करताना पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. खारघरच्या सेक्टर १८ येथील एका इमारतीत  किंग्ज राहतो असे समजल्यावर पोलीसांनी येथे सापळा रचला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:19 am

Web Title: fake seeds soldering by gang arrested
Next Stories
1 जेएनपीटीतील कामगार आंदोलन सुरूच
2 उरण नगरपालिकेच्या वाचनालयाची दुरवस्था
3 ‘लोकसत्ता’मुळे आत्मविश्वासात वाढ
Just Now!
X