News Flash

न्हावा शेवा- शिवडी सागरी सेतूला शेतकऱ्यांचा विरोध

२२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचा काही भाग न्हावा, गव्हाण, शेलघर, जासई व चिर्ले गावातून जातो.

कारवाईसाठी गेलेले सिडकोचे पथक माघारी

न्हावा शेवा-शिवडी सागरी सेतूसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी बुधवारी तिथे गेलेल्या सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाला जासईतील ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) या प्रकल्पासाठी जासई, गव्हाण व चिर्ले येथील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

जासई येथे कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस, सिडकोचे अधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा झाल्यानंतर कारवाई मागे घेत सिडकोच्या पथकाला परत फिरावे लागले.  त्यामुळे उरणमध्ये न्हावा शेवा-शिवडी सागरी सेतूच्या वाटेत अडथळा आला आहे.

प्रस्तावित न्हावा शेवा-शिवडी सागरी सेतू उरण तालुक्यातील चिर्ले येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-ब वर उतरतो. २२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचा काही भाग न्हावा, गव्हाण, शेलघर, जासई व चिर्ले गावातून जातो. त्यामुळे तेथील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. त्या बदल्यात शेतकऱ्यांना काही सुविधा व मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी न करताच सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने उरण-पनवेल राज्य महामार्गालगतच्या जासई येथील टाटा मोटर्सच्या शोरूमवर कारवाईसाठी पथक आणले. या वेळी जासईमधील शेतकऱ्यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात काही कोळ तणाव निर्माण झाला होता.

मागण्यांची पूर्तता करा, त्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही अशी भूमिका सागरी सेतू संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील, महेंद्र घरत, अतुल पाटील यांनी घेतली. त्यामुळे प्रचंड फौजफाटा घेऊन आलेल्या सिडकोच्या अनधिकृतविरोधी पथकाला कारवाई न करताच परतावे लागले. उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होत्या. सिडको संपादित तसेच संपादित नसलेल्या मात्र अधिसूचनेत असलेल्या जमिनीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई होणार होती. ४ जानेवारीला सिडकाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सिडको अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे नियंत्रक एस. आर. राठोड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 2:56 am

Web Title: farmers protest against sewri nhava sheva sea link
Next Stories
1 बेलापूर, नेरुळचा पार्किंग प्रश्न मिटणार?
2 पनवेल पालिकेत स्त्रीशक्ती
3 बस आगारात अन्य वाहनांची घुसखोरी
Just Now!
X