News Flash

ग्रामपंचायत कार्यालयाला भीषण आग

सोनारी ग्रामपंचायतीचे कार्यालय गावात मध्यवर्ती ठिकाणी आहे.

उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला गुरुवारी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास भीषण आग लागली. यात कार्यालयाचा बराचसा भाग जळून खाक झाला. गावात वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या तारांचे घर्षण होऊन झालेल्या शार्टसर्किटमुळे कार्यालयाला आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दल तसेच ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे केवळ एक तासाच्या आत ही आग विझविण्यात यश आले आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच ग्रामपंचायतीची कागदपत्रेही सुरक्षित आहेत.

सोनारी ग्रामपंचायतीचे कार्यालय गावात मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याजवळून गावात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या तारा आहेत. गावातील घरांची संख्या व उंची वाढू लागल्याने अनेक घरांच्या छपरा जवळून या तारा जात आहेत. त्यामुळे घरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनाही धोका आहे. अशा प्रकारच्याच तारांचे हवेच्या वेगामुळे घर्षण होऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात न्हावाशेवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी दिली. तर पोलीस पंचनामा करून या आगीमुळे ग्रामपंचायतीचे किती नुकसान झाले आहे.

याची माहिती पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर मिळेल अशीही माहिती त्यांनी या वेळी दिली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण कागदपत्रे तळमजल्यावर असल्याने ती सुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:28 am

Web Title: fire at soneri gram panchayat office
टॅग : Fire,Uran
Next Stories
1 उरणकरांच्या आरोग्याची ‘माती’
2 राज कंधारी आत्महत्याप्रकरण सहकाऱ्याला अटक
3 उरणमध्ये १२ तास वीजपुरवठा खंडीत
Just Now!
X