News Flash

साडेपाच लाख चाचण्या

नवी मुंबई शहरात पहिल्या टप्प्यात एकूण ३१ हजार १७० जणांची लसीकरणासाठी ‘अ‍ॅप’वर नोंदणी करण्यात आली होती.

संग्रहीत

लोकसंख्येच्या तुलनेत ३६ टक्के; २४ हजार आरोग्यसेवकांना लस

नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून करोना रुग्ण वाढले असून पालिका प्रशासनाने करोना चाचण्याही वाढविल्या आहेत. गेल्या ११ महिन्यात पालिका प्रशासनाने ५ लाख ३६ हजार ७५८ नागरीकांच्या करोना चाचण्या केल्या असून त्या लोकसंख्येच्या तुलनेत ३६ टक्के आहेत. तर आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २४ हजार करोनायोद्धांना लस देण्यात आली आहे.

नवी मुंबईत सोमवारपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. बुधवारी १३० तर गुरुवारी १२२ करोना रुग्ण शहरात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून करोना नियमांची काटेकोर अमलबजावणी शहरात सुरू केली आहे. दुसरीकडे करोना चााचण्याही वाढविण्यात आल्या आहेत.

महापालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा नेरुळमध्ये ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर दिला. आयुक्तांनी रुग्ण वाढले तरी चालेल, मात्र जास्तीत जास्त संशयीत नागरिकांच्या करोना चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवसाला तीन ते साडेतीन हजार करोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार

गेल्या ११ महिन्यात ५ लाख ३६ हजार ७५८ नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यात आरटीपीसीआर चाचण्या २ लाख ३८ हजार ६८० तर प्रतिजन चाचण्या या २ लाख ९८ हजार ०७८ इतक्या करण्यात आल्या आहेत. शहराची तरंगती लोकसंख्या १५ लाख असून त्या तुलनेत आतापर्यंत ३६ टक्के नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात अधिक चाचण्या करण्याचे पालिकेचे लक्ष आहे. तर दर दहा लाखांमागे शहरातील करोना चाचण्यांचा दर चांगला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लसीकरणावर भर

नवी मुंबई शहरात पहिल्या टप्प्यात एकूण ३१ हजार १७० जणांची लसीकरणासाठी ‘अ‍ॅप’वर नोंदणी करण्यात आली होती. त्यातील २४ हजार ०१० जणांचे म्हणजेच ७७ टक्के जणांचे लसीकरण आतापर्यंत करण्यात आले आहे.

११९ नवे करोनाबाधित

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या

वाढली असून  शुक्रवारी ११९  नवे करोनाबाधित आढळले  तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५५,१६३ इतकी झाली आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९७ टक्के  असून एकूण ५२,८२३ जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधिन रुग्ण १,२२२ इतके आहेत. तर एकूण मृत्यू  झालेल्यांची संख्या १११८  इतकी झाली आहे.

शहरात अद्ययावत प्रयोगशाळा असून जास्तीत जास्त नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहेत. दिवसाला सरासरी ३ हजार नमुने घेतले जातात. लसीकरणाची टक्केवारीही शहरात अधिक आहे.  -अभिजीत बांगर, आयुक्त , महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:05 am

Web Title: five and a half lakh corona virus infection tests akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सेवा रस्ते रखडल्याने महामार्गावर कोंडी
2 ‘एपीएमसी’त कांदा २५ ते ३० रुपयांवर
3 अदानी उद्योग समूहाला विमानतळ प्राधिकरणाची मंजुरी
Just Now!
X