25 February 2021

News Flash

नवी मुंबईतील माजी नगरसेवकाची आत्महत्या

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईच्या दिघा भागातील माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर (५२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

या प्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

दिघा भागातील गणपती पाडा परिसरात भोलानाथ ठाकूर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. गुरुवारी रात्री जेवल्यानंतर ते शयनकक्षेत गेले. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांनी शयनकक्षाचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सकाळी त्यांच्या मुलांनी शयनकक्षाचा दरवाजा तोडला. त्या वेळी भोलानाथ यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

यानंतर कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:26 am

Web Title: former navi mumbai corporator commits suicide abn 97
Next Stories
1 ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे कॉँक्रीटीकरण
2 करोना रुग्णांची शंभरी पार
3 नाईकांची ‘एसआयटी’ चौकशी व्हावी
Just Now!
X