News Flash

दिघा येथील चार बांधकाम व्यावसायिकांना पोलीस कोठडी

रबाले एमआयडीसी पोलिसात बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

digha illegal construction
दिघा येथील बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या धोरणाचा आराखडा मंजुरीसाठी दोनवेळा न्यायालयात सादर केला. मात्र विकास नियमावली आणि पालिका कायद्याला बगल देऊन तसेच कुठलाही सारासार विचार न करता हे धोरण आखण्यात आल्याचा ठपका ठेवत दोन्ही वेळेस न्यायालयाने सरकारचे हे धोरण बासनात गुंडाळले.

बेकायदा बांधकाम प्रकरण
दिघा येथील बेकायदा बांधकामप्रकरणी रबाले एमआयडीसी पोलिसात बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना ३० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवर दिघा परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी ९४ बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या इमारतीवर हातोडा चालविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. यानुसार केरू प्लाझा, शिवराम, पार्वती आणि पांडुरंग अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केले होते. बांधकाम व्यावसायिकरमेश खारकर, किशोर कोळी, नितीश मोकाशी, मुकेश मढवी हे सध्या अटकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2015 7:36 am

Web Title: four builders get police custody in digha illegal construction case
टॅग : Police Custody
Next Stories
1 नवी मुंबईच्या महापौरांना धमकीचे पत्र
2 दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौघांना अटक
3 शेकडोइमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कुचकामी
Just Now!
X