News Flash

पनवेलमध्ये चौघांची हत्या

पनवेल आणि परिसरात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत हत्येची चार प्रकरणे घडली.

Deadly attack on youth in Nashik : या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पनवेल आणि परिसरात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत हत्येची चार प्रकरणे घडली. आदई गावाजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. दुसऱ्या घटनेत सिमरन मोटार शोरूमच्या जवळील आमराईमध्ये प्लास्टिकच्या तीन पिशव्यांमध्ये अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. तिसऱ्या घटनेत विचुंबे गावात मुलाने संपत्तीच्या वादातून वडील आणि भावाची हत्या केली.

नवीन पनवेल परिसरातील आदई गावालगतच्या शेतजमिनीवर मंगळवारी सायंकाळी एका अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न खांदेश्वर पोलीस करत आहेत. मृतदेह अर्धवट जळालेला असल्यामुळे ही हत्या आहे, की आत्महत्या याबाबत पोलीस साशंक होते, मात्र जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मारेकऱ्यांनी जाळण्यापूर्वी तरुणाच्या डोक्यात, पोटात व पायांवर गंभीर जखमा केल्याचे पोलिसांनी सांगितले. खांदेश्वर पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सिमरन शोरूमजवळ आढलेल्या मृतदेहाचीही ओळख पटलेली नाही. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्यांची टोळकी भुंकत असल्यामुळे पोलिसांनी तपास केला असता पिशव्यांमध्ये मृतदेहाची माहिती पोलीसांना मिळाली. महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे आहे. आदईतील घटनेचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

विचुंबे गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लक्ष्मण म्हात्रे (५४) आणि रूपेश म्हात्रे (३०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्यामुळे पोलीसांनी इतर माहिती देण्यास नकार दिला.

तसेच पनवेल शहराच्या परिसरात सीमरन मोटारजवळील आमराईमध्ये प्लॅस्टीक पिशवीला मंगळवारी एका तरूणाला आदई गावालगतच्या शेतजमिनीवर हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. या दोनही हत्यांचा आपसात काही संबंध आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:06 am

Web Title: four killed in panvel
Next Stories
1 उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ
2 न्हावा शेवा- शिवडी सागरी सेतूला शेतकऱ्यांचा विरोध
3 बेलापूर, नेरुळचा पार्किंग प्रश्न मिटणार?
Just Now!
X