22 January 2021

News Flash

एच.आय.व्ही., कर्करोगासह संसर्गजन्य आजारांच्या मोफत चाचण्या

महापालिकेची नेरुळ येथील प्रयोगशाळा भविष्यातही फायद्याची

महापालिकेची नेरुळ येथील प्रयोगशाळा भविष्यातही फायद्याची

नवी मुंबई : करोनाकाळात होत असलेली रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरुळ येथील माता बाल रुग्णालयात तयार करण्यात आलेली अद्ययावत प्रयोगशाळा भविष्यातही  उपयुक्त ठरणार आहे. या ठिकाणी करोना संकटानतर एच.आय.व्ही., कर्करोगासह संसर्गजन्य आजारांच्या मोफत चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात विविध तपासण्यांसाठी होत असलेली रुग्णांची  परवडही थांबणार आहे.

४ ऑगस्टपासून नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात पालिकेची व एमएमआर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वाधिक अद्ययावत व मोठय़ा क्षमतेची ही प्रयोगशाळा महापालिकेने सुरू केली.  दिवसाला १ हजार करोना चाचण्या या ठिकाणी केल्या जात आहेत.

नवी मुंबईत पालिकेची आरोग्य सेवा नेहमीच चर्चेत राहिली आहे. पालिकेने रुग्णालयांसाठी विविध ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने आरोग्य सेवा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यात पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळाही नव्हती. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेत रुग्णांची विविध तपासण्यांसाठी आर्थिक लूट होत होती.

करोना संसर्ग शहरात सुरू झाल्यानंतर शहरात प्रयोगशाळा नसल्याने नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठविले जात होते. याचे अहवाल येण्यासाठी संशयिताला पाच ते सात दिवसही लागायचे. तोपर्यंत तो संशयित अनेकांच्या संपर्कात आल्याने संपर्कातून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले होते. चाचणी अहवाल उशिरा प्राप्त झाल्यामुळे पाच दिवस मृतदेह शवागारात ठेवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रयोगशाळेसाठी पालिकेला दीड कोटी खर्च आला असून आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक करोना चाचण्या या प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत.

आवश्यक असणारे मनुष्यबळही देण्यात आले असून या काळात ती फायद्याची ठरत आहे. अहवाल लवकर मिळत असल्याने रुग्ण शोध तात्काळ होत आहे. त्यामुळे रुग्णाचे अलगीकरण करून तात्काळ उपचार मिळत आहेत. त्यामुळे शहरातील करोना मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे.

पालिकेला पावसाळ्यातील साथीच्या आजारांच्या चाचणीसाठीही ठाण्याकडे धाव घ्यावी लागत होती. परंतु पालिकेने उभारलेल्या स्वतंत्र अद्ययावत प्रयोगशाळेमुळे  आता या चाचण्याही या पुढे या ठिकाणी होती. तसेच खर्चीक असणाऱ्या एच.आय.व्ही., कर्करोग

यांसह संसर्गजन्य आजाराच्या चाचण्या याच प्रयोगशाळेत मोफत करता येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

खासागी प्रयोगशाळेतील चाचण्यांचे सरासरी दर

* एचआयव्ही : ६५० पासून पुढे

* कर्करोग : ५००० ते  ७०००

* एचसीव्ही :१,४५० ते १७,०००

* एचबीव्ही : ९०० पासून पुढे

* एच१.एन१: ४ हजारांपासून पुढे

* चिकनगुनिया : ९५०पासून पुढे

* एमटीबी : २४०० पासून पुढे

* कोविड १९ : २,८००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 3:23 am

Web Title: free test for infectious diseases including hiv and cancer zws 70
Next Stories
1 टोमॅटो ३० तर वाटाणा १०० रुपये किलो
2 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक डक
3 नवी मुंबईत करोनाबधितांची संख्या २६ हजाराच्या पार
Just Now!
X