News Flash

ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ

विभागप्रमुखावर कारवाईचा पालिका आयुक्तांचा इशारा

विभागप्रमुखावर कारवाईचा पालिका आयुक्तांचा इशारा

नवी मुंबई : गेली वर्षभर प्रशासकीय कारभार सुरू असलेल्या महापालिकेत ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक कामांना निविदा प्रक्रिया न राबविताच मुदतवाढ दिली जात आहे. यामुळे देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात रस्त्यांची यांत्रिक साफसफाई, सीसीटीव्ही देखभाल, वंडर्स पार्कमधील देखभाल दुरुस्ती, मास टेलिकॉम, रुग्णालय साफसफाई आदी कामांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. पालिका आयुक्तांना याबाबत विचारल असता, कारण नसताना मुदतवाढ दिल्यास थेट विभागप्रमुखांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यांत्रिक साफसफाईचे काम २०१२ ते २०१९ या कालावधीसाठी देण्यात आले होते. त्या कामाला सध्या मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील ‘सीसीटीव्ही’ देखभाल दरुस्तीचे काम २०१२ पासून देण्यात आले आहे. त्याची २०१८ पर्यंत मुदत होती. परंतु या कामासाठीही वारंवार मुदतवाढीत देण्यात आली आहे.  महापालिकेतील ‘ई गव्हर्नस’चे काम २०१६ मध्ये देण्यात आले होते. त्याला १ वर्षांची मुदत होती. त्यानंतर सातत्याने मुदतवाढीवर हे काम तेच ठेकेदार करीत आहेत. या कामाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती, मात्र स्थायी समितीत प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. या कामांबरोबरच ‘मास टेलिकॉम’ हे तांत्रिक काम २०१२ मध्ये देण्यात आले होते. त्याची मुदत २०१६ पर्यंत होती, मात्र पूर्वीचेच ठेकेदार ते काम करीत आहेत.

पालिकेच्या विविध विभागांमार्फत ठेकेदारांच्या माध्यमातून विविध कामे केली जातात. नियमानुसार निविदा मागवून या कामांचे कार्यादेश दिले जातात. यासाठी कालावधी ठरवून दिलेला असतो. मुदत संपल्यानंतर त्या कामाची परत निविदा प्रक्रिया राबवून ते काम दिले जाते. मात्र नवी मुंबई महापालिकेत अनेक कामांबाबत ही प्रक्रिरा राबवली जाताना दिसत नाही. एकदा काम दिल्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतही तेच ठेकेदार काम करीत असतात. यामागे मोठे आर्थिक गणित लपल्याचे बोलले जात असून याबाबत पालिका आयुक्तांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. आशाप्रकारामुळे त्या कामाची देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याने कामांचा दर्जाही खालावत आहे.  याबाबत विविध नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांंनीही पालिका आयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र हा प्रकार पालिकेत सुरूच आहे.

नवी मुंबई पालिकेत सद्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे नियमीत सभा होत न नसल्याने आशा प्रकरांत वाढ झाल्याचेही बोलले जात आहे.

ज्या विभागातील कामाची मुदत संपण्यापूर्वी काही महिने अगोदरच नवीन कामाच्या निविदेबाबत कार्यवाही न करता मुदतवाढ दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढे  कामाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन कामाच्या निविदेसाठी कार्यवाही न करता  कामाला मुदतवाढ दिल्यास संबंधित विभागप्रमुखावर कारवाई निश्चित केली जाणार आहे. याबाबतचा रितसर लेखी आदेशच काढण्यात येणार आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:27 am

Web Title: frequent extension to contractors by navi mumbai municipal corporation zws 70
Next Stories
1 सिडकोकडून ग्रामदेवतांचीही पुनर्स्थापना
2 पक्ष्यांचे खारघर
3 पंधरा हजार  घरे पडून
Just Now!
X