चेन्नई पूरग्रस्तांना मदत म्हणून डीवायएफआय संघटनेने उरण शहरात फेरी काढून काही तासातच दहा हजारांची मदत गोळा केली आहे. ही मदत केंद्रीय समितीच्या वतीने चेन्नई येथील पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

मदत गोळा करण्यासाठी डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उरण शहरातून डबा घेऊन एक फेरी काढली होती. यावेळी डीवायएफआयच्या राज्य कोषाध्यक्ष भास्कर पाटील, रायगड जिल्हा सचिव संतोष ठाकूर तसेच इतर कार्यकर्तेही सहभागी झाले होते. उरणमधील व्यापारी, ग्राहक तसेच नागरिकांनी आपापल्या परीने मदत केली. ही मोहीम उरण तालुक्यात राबविण्यात येऊन जास्तीत जास्त रक्कम चेन्नईमधील पुरग्रस्तांसाठी दिली जाईल, असे डीवायएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.