गणेशोत्सवातील जाहिरातबाजी, शहर विद्रुपीकरणाला चाप; मंडपांच्या वाटमारीला आवर

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत रस्तोरस्ती होणारी बेसुमार फलकबाजी, त्यामुळे वाहतुकीत येणारे अडथळे, रस्त्यांवर खड्डे पाडून उभारले जाणारे, वाहनांची व पादचाऱ्यांची वाट अडवणारे मंडप या नियमभंगाला काही प्रमाणात चाप बसल्याचे चित्र सध्या तरी नवी मुंबईत आहे. राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर आधारलेले आर्थिक गणित कोसळल्यामुळे खर्च भागवताना मंडळांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई शहरात ३५५ तर पनवेल विभागात १७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांचे पदाधिकारी सध्या परवानग्या मिळवण्यात आणि सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न झाले आहेत.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
dombivli shilphata road marathi news, shasan aplya dari dombivli marathi news
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या परवानग्या मिळवताना व मंडप उभारताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करताना कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई व पनवेल महापालिकेने पवानगी मिळवण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. नवी मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात २० कलमी नियमावलीच तयार केली आहे. नवी मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, महापालिका यांनी उत्सवाबाबत नियमावली आखून दिली आहे आणि मंडळांनीही ते बऱ्याच प्रमाणात पाळले आहेत.

परिमंडळ १ व २ मधील पोलीस उपायुक्तांनी सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन उत्सवाबाबत नियमावलीची माहिती दिली आहे. सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारताना रस्त्याच्या चौथ्या भागापेक्षा अधिक भागाचा वापर करू नये असा नियम करण्यात आला आहे. ठरावीक उंचीच्याच कमानी उभारताना मंडळांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर कोणतेही खोदकाम करता येणार नसून वाळूचे ड्रम भरून त्यामध्ये लाकडी बांबू बांधून मंडप व कमानी उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्युत विभागाच्या परवानगीनेच वीज वापरता येणार आहे. वीजचोरी केल्यास मंडळावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दहीहंडीप्रमाणेच विविध मंडळांनी गणेशोत्सव साजरे करण्यासाठी मैदाने व रस्ता न अडवण्याची खबरदारी घेतली आहे. नवी मुंबई व पनवेल शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह कायम असला तरी नियमांचे भान राखल्याचे दृश्य आहे.

वाशीतील रस्त्यांचा मोकळा श्वास

न्यायालयाचे र्निबध येण्यापूर्वी वाशीतील सेक्टर १० व १७ येथील मंडळांमध्ये स्वागत कमानी लावण्याची स्पर्धाच लागत असे. जाहिराती आणि रोषणाईमुळे गणेशोत्सव काळात या परिसराला भव्य जत्रेचे स्वरूप येत असे. यंदा मात्र या दोन्ही भागांतील रस्ते रिकामे आहेत. शुभेच्छा फलकांमुळे गुदमरणाऱ्या या रस्त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात मोकळा श्वास घेतला आहे.

आर्थिक रसदच बंद

निवडणुकांच्या काळात गणेशोत्सव मंडळांना राजकीय व्यक्तींकडून चांगली मदत होत असल्याने मोठय़ा धुमधडाक्यात उत्सव साजरा केला जातो. इतर वेळी मात्र सार्वजनिक मंडळांच्या बाहेर रस्त्यावर स्वागत कमानी उभारून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जायचा, परंतु आता रस्त्यावरील कमानी व खड्डे खोदण्यासंदर्भात कडक नियमावली करण्यात आली आहे. त्यामुळे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न बंदच झाले आहे. त्याचा परिणाम उत्सवावर होत आहे.

पालिकेच्या महसुलातही घट

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांसाठी भुईभाडे आकारले जाते. स्वागत कमानींसाठीही पालिकेकडून ठरावीक रक्कम वसूल केली जात होती, परंतु आता एका मंडळाला दोनच कमानी उभारता येतील असे र्निबध घालण्यात आले आहेत. तसेच स्वागत कमानींवर जाहिराती न लावता फक्त मंडळाचे नाव व भक्तांच्या स्वागताचा मजकूर देता येत असल्याने जाहिरातबाजीमधून मंडळांना मिळणारी रसद बंद झाली आहे. हजारो कमानींमधून पालिकेला मिळणार महसूलही कमी झाला आहे, परंतु फुकटय़ा जाहिरातबाजांमुळे होणाऱ्या शहर विद्रूपीकरणास न्यायालयाच्या आदेशामुमुळे चाप बसला आहे.

परवानग्या मिळवताना कार्यकर्त्यांची धावपळ होत आहे. दरवर्षी वाशीमध्ये गणेशोत्सवात स्वागत कमानी उभारल्या जात. परंतु त्यावर बंधने आली आहेत. मंडळाचे हे ३७वे वर्ष असून नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजर केला जाणार आहे. शिवशंकराच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.

भरत नखाते, संस्थापक अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यापारी संघ, सेक्टर १, वाशी

शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. गणशोत्सवाची तयारी मंडळाकडून सुरू असून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अटी-शर्तीचा भंग केल्याच्या तक्रारी नाहीत. मंडळांमध्येही जनजागृती केल्याने मंडळे व कार्यकर्ते नियमांचे पालन करत आहेत.

डॉ. सुधाकर सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. पालिकेने मंडप व इतर बाबींसाठी २० नियम आखून दिले असून कोणत्याही प्रकारे नियमभंग केल्यास मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे.

दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका, परिमंडळ १.