News Flash

अर्बनहाटमध्ये गणेश मेळा

संस्कृती आणि कलेची परंपरा जोपासणा करणाऱ्या गणेश मेळ्यास सीबीडी येथील अर्बनहाटमध्ये सुरुवात झाली आहे.

| September 4, 2015 12:04 am

संस्कृती आणि कलेची परंपरा जोपासणा करणाऱ्या गणेश मेळ्यास सीबीडी येथील अर्बनहाटमध्ये सुरुवात झाली आहे. बाप्पाचे आगमन होणार असल्याने सजावटीसाठी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी हातमागावरील साडय़ा, पंजाबी ड्रेस, पोती, कुडता, पायजमा हेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे म् नारळाच्या वाटीपासून बनवलेला गणपती, लहान मुलांसाठी हत्ती, घोडे आहेत.  लहान मुलांचे कपडे घेण्यासाठी नागरिक सरसावत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांच्या शोभेच्या वस्तू, झुंबर यांसारख्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  महिला बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या घरगुती खाद्य, मालवणी, कोल्हापुरी, कोकणी अशा विविध शाकाहारी तसेच मांसाहारी खमंग आणि चमचमीत खाद्यपदार्थाची मेजवानी ठेवण्यात आली आहे.  लसनांची, शेंगदाणा चटणी आदी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. नारळाच्या सालीपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू हे आकर्षण ठरत आहे.  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, बंगाल आदी राज्यांतून कारागिरांनी व व्यापाऱ्यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या बाबूंचे फर्निचर, लाकडी हस्तकलेच्या वस्तू मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत. वारली पेंटिंगपासून बनवलेल्या  टी-शर्ट, मोबाइल कवर, ग्रिटिंग कार्ड, भेटवस्तू यांसारख्या वस्तू उपलब्ध आहेत. गवतापासून बनविलेल्या चिमण्यांची घरटी, घरे, प्राणी, पक्षी हे मेळाव्यातील आकर्षणच बनले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 12:04 am

Web Title: ganesh exhibition in arbanhat
Next Stories
1 मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
2 उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
3 उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
Just Now!
X