नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक देखावे

आधुनिकता आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यांतून पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या देखाव्यांतून सामाजिक संदेश दिला आहे.

pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण

नेरुळमधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती मंडळाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. महाराष्ट्र पोलीस आणि खाकी वर्दीतला खरा हिरो असा आशय घेतला आहे. खाकी वर्दीच्या आत एक माणूसही लपलेला असतो. २४ तास सुरक्षा देणाऱ्या या रक्षकांमध्ये आणि नागरिकांमध्ये दरी वाढत चालली आहे. त्यामुळे पोलिसाचा एक माणूस म्हणून विचार करण्याची गरज असल्याचा संदेश देखाव्यांतून दिला आहे. यासाठी चलचित्र आणि चित्रफितींचा वापर करण्यात आला आहे.

सीवूड्स रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सीवूड्स पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यात यंदा प्लास्टिकविरोधी संदेश देण्यात आला आहे. यासाठी रिडय़ूस, रियुज, रिसायकल या तत्त्वावर देखावा साकारलेला आहे.

शिवआधार चॅरिटेबल ट्रस्ट ,शिवाजीनगर नेरुळ या संस्थेतील सदस्यांनी यंदा अनोखा गणेशोत्सव साजरा केला. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अभ्यासकेंद्रातील विद्यर्थ्यांंनी नेरुळ एलपी जंक्शन येथे पदपथावरील एका झाडालाच श्रीगणेशाचे रुप दिले.कोणत्याही प्रकारची इजा न करता झाडालाच मुकुट, हार व पितांबर लावून गणपती बनवले.  झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या संस्थेने दिला आहे