पनवेल महानगरपालिकेवर केवळ कचरा उचलण्याची जबाबदारी

food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर
kasba peth cash seized
कसबा पेठेत प्रशासनाची कारवाई, केले ‘इतके’ रुपये जप्त!
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईतील शहरी भागात चार महिन्यांपूर्वी निर्माण झालेला कचरा सफाईचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिडको हस्तांतरणाला मुदतवाढ देण्यास तयार नाही, तर पनवेल पालिका ही सेवा घेण्यास तूर्त राजी नाही. त्यामुळे नवीन वर्षांत रहिवाशांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग पुन्हा साचण्याची शक्यता आहे. कचरा साफसफाईसारख्या मूलभूत सेवा पालिकेने देणे आवश्यक असून शहरी भागातील केवळ कचरा उचलण्याची जबाबदारी पनवेल पालिकेची असून त्या कचऱ्याचे व्यवस्थापन सिडकोच्या वतीने केले जाणार आहे, अशी भूमिका सिडकोने घेतली आहे. सिडकोने मुदतवाढ न दिल्यास पनवेल पालिका प्रशासन या संदर्भात राज्य शासनाकडे दाद मागणार आहे.

खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल या शहरी भागांतील कचऱ्याचे व्यवस्थापन सध्या सिडकोकडे आहे. या भागांतून दिवसाला ३५० मेट्रिक टन घनकचरा गोळा होतो. १५ महिन्यांपूर्वी पनवेल महापालिकेची स्थापना झाली. त्यामुळे पालिकेने सिडकोच्या अखत्यारीतील काही सेवा टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करून घ्याव्यात, असा सिडकोचा आग्रह आहे. शहरी भागांतील बांधकाम परवानगीचे अधिकार सिडकोने पालिकेला हस्तांतरित केले आहेत. याचवेळी कचरा उचलणे व त्याची वाहतूक करून तो कचराभूमीवर नेण्यासारख्या महत्त्वाच्या सेवा पालिकेने हस्तांतरित करुन घ्याव्यात, असे प्रयत्न गेले सहा महिने केले जात आहेत. कचरा साफसफाई हा खर्चीक विषय असल्याने या सेवेच्या हस्तांतराला आणखी मुदतवाढ, द्यावी असा पनवेल पालिकेचा आग्रह आहे. सिडकोने लादलेली कचरा सेवा स्वीकारण्याची पालिकेची तयारी नाही, मात्र सिडको प्रशासन आता या हस्तांतराला मुदतवाढ देण्यास तयार नाही. १ जानेवारीनंतर ही सेवा पालिकेला हस्तांतरित केली जाणार असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून त्याची सर्व तयारी झाली आहे. सिडकोच्या अखत्यारीत असलेली साफसफाई ताब्यात घेण्यात यावी, असा ठराव नगरसेवकांनी मंजूर केल्याने सिडकोला आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे हे हस्तांतरण अटळ असून पनवेल पालिकेला ही सेवा ३१ डिसेंबरला ( रविवार आहे) रात्री हस्तांतरित करून घ्यावी लागणार आहे.

शहरी भागातील ३५० मेट्रिक कचरा पालिकेला उचलावा लागणार आहे. या कचऱ्याची तळोजा येथील चाळ गावाजवळ शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे काम मात्र सिडको करणार आहे. सिडको ही सेवा द्यायला तयार आहे तर पालिका ही सेवा घ्यायला तयार नाही. दोन स्वायत्त संस्थांच्या भांडणात सिडकोच्या शहरी भागातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

सिडकोच्या शहरी भागातील साफसफाई हस्तांतरित करून घेण्यास पनवेल पालिकेचा कधीही नकार नाही. तसा प्रस्तावच मंजूर करण्यात आलेला नाही. ही सेवा हस्तांतरित करून घेण्यासाठी पालिका अद्याप आर्थिकदृष्टय़ा सक्षम नाही. सिडको काही काळ या सेवेच्या खर्चाचा भार उचलेल, पण कालांतराने पालिकेला हा आर्थिक भरुदड सोसावा लागणार आहे. आज ना उद्या ही सेवा हस्तांतरित करून घ्यायचीच आहे, पण त्याची पूर्वतयारी करून नंतर घेतल्यास ते अधिक चांगले होईल. या संदर्भात सिडकोला पुन्हा विनंती केली जाणार आहे.

डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल पालिका

दैनंदिन कचरा साफसफाई हा प्रत्येक पालिका अथवा नगरपालिकांचा विषय आहे. महापालिका स्थापनेपर्यंत सिडकोने आपल्या शहरी भागातील साफसफाई केलेली आहे, मात्र पालिका स्थापन होऊन आता १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे ही प्राथमिक सेवा त्यांनी हस्तांतरित करून घेणे आवश्यक आहे.

राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको