जगदीश तांडेल

सिडकोचे दुर्लक्ष; अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Kalyan, Road Works, Waldhuni Flyover, Traffic Jams, Commuters, public,
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

उरण परिसरातील सिडकोच्या जमिनींवर असलेल्या खारफुटींवर कचरा तसेच राडारोडा टाकला जात आहे. त्याला आगी लावून व रसायनांचा वापर करून ही खारफुटीची झाडे नष्ट करण्याचा प्रकारही घडत आहे. सिडकोचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाने मात्र संबंधित विभागांशी संपर्क साधून गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली.

कांदळवन(खारफुटी) ही जैवविविधता तसेच निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक व महत्त्वपूर्ण वनस्पती असून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाकडे देण्यात आलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी खारफुटी ही शासकीय तसेच महामंडळाच्या जागेवरही आहेत.

समुद्राच्या भरती व ओहटीचे पाणी किनाऱ्यावर येत असते. त्यामुळे जमिनीची धूप होण्याची शक्यता असते. ही धूप थांबविण्याचे व जमीन वाचविण्याचे महत्त्वाचे काम खारफुटीचे जंगल, झाडे-झुडपे यांच्याकडून केले जाते. तसेच अनेक प्रकारच्या माशांची पैदासही प्रथम याच खारफुटीमुळे होत असते. त्यानंतर ती समुद्रात जाऊन वाढते. अशा प्रकारची महत्त्वाची असलेली खारफुटी टिकावी याकरिता थेट उच्च न्यायालयानेच दखल घेतली असून ज्या ठिकाणावरून खारफुटीची कत्तल केली जाईल किंवा नष्ट केली जाईल त्याऐवजी तेवढीच लागवड करण्याची अट आहे. तसेच खारफुटी नष्ट करण्याची परवानगीही उच्च न्यायालयाकडूनच घ्यावी लागते.

उरण परिसरात अनेक ठिकाणी विकासाची कामे सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या वनविभागाकडून परवानगी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी परवानगीपेक्षा अधिकची खारफुटी नष्ट केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी या खारफुटीवर कचरा टाकून ती नष्टही केली जात आहे.

कारवाईचे अधिकार तहसीलदारांनाही उरणच्या वनविभागाचे वनसंरक्षक शशांक कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ग्रामपंचायती किंवा व्यक्तींकडून खारफुटीच्या झाडांवर कचरा टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा ग्रामपंचायतींवर गुन्हे दाखल करून त्यांना दंडही आकारण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तर नष्ट

होणाऱ्या खारफुटीसंदर्भात थेट गुन्हे दाखल करण्याचे अधिकार महसूल विभाग म्हणून तहसीलदारांनाही असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.