26 October 2020

News Flash

लसूण स्वस्त; गृहिणींना दिलासा

वाशी येथील घाऊक बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांची घसरण

वाशी येथील घाऊक बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांची घसरण

नवी मुंबई : वाशी येथील एपीएमसी बाजारात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात झाली असून आवक वाढल्याने दर उतरले आहेत. घाऊक बाजारात हे दर किलोमागे १०० रुपयांनी उतरून आता ५० ते १०० रुपयांवर आले आहेत. दर घटल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. मात्र दोन वर्षांपूर्वी लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनही कमी झाले होते. परिणामी लसणाचे दर गगनाला भिडले होते.

दोन वर्षांपूर्वी २०० ते २५० रुपयांनी लसूण विकला जात होता. मात्र २०१८ मध्ये लसणाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाल्याने दर प्रतिकिलो ३० रुपये होते. मात्र, गतवर्षी व यंदा देखील लसणाचे दर तेजीत होते. घाऊक बाजारात मिळणारा प्रतिकिलो लसून १५०ते २०० रुपयांनी उपलब्ध होता. मात्र, बाजारात आता आवक वाढली असल्याने या दरात १०० रुपयांनी घसरण झाली असून दर ५० ते १०० रुपयांवर आले आहेत. सध्या मध्य प्रदेश येथून नवीन लसणाच्या २० गाडय़ांची आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:21 am

Web Title: garlic cheap fall in wholesale market at vashi zws 70
Next Stories
1 पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना आता हक्काचे घर
2 नवी मुंबई पालिकेची आता ‘आयएएस’ अकादमी
3 सरकारविरोधात भाजपचा संघर्ष
Just Now!
X