22 July 2019

News Flash

जुईनगरला रुळावर अखेर फाटक  

पालिकेने घटनेनंतर तेथे गतीरोधकही बसविले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

७० कोटींचा उड्डाणपूल दृष्टिक्षेपात; सुरक्षारक्षकही नेमणार

जुईनगर रेल्वे रुळावर एनएमएमटी बस व रेल्वेच्या झालेल्या अपघातानंतर येथे सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या असून रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. सुरक्षारक्षकही ठेवण्यात येणार आहे. यात रेल्वे फाटक व सुरक्षारक्षक ही तात्पुरती उपाययोजनांसह उड्डाणपूल बांधण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. पालिकेने घटनेनंतर तेथे गतीरोधकही बसविले आहेत.

अपघात झाल्यानंतर रेल्वेने या ठिकाणाचा रस्ताच अनधिकृत व रेल्वेची पूर्वपरवानगी न घेता बांधला असल्याचा दावा रेल्वेने केल्यानंतर घडामोडींना वेग आला व संबंधितांच्या बैठका होऊन या ठिकाणी तात्काळ अफघात टाळण्यासाठी रम्बलर बसविण्यात आले. परंतु रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बसवण्यात आले आहे. त्यामुळे  होणारे अपघात थांबणार आहेत.

पालिका रेल्वेला १४ लाख देणार

याचे काम रेल्वेने केले असून खर्च पालिकेने करावा असे ठरले होते. त्यानुसार बुधवारी येथे रेल्वेने फाटक बसवले आहे. ही सर्वच कामे व सुरक्षारक्षक यासाठी पालिका रेल्वेला १४.५० लाख रुपये देणार असल्याचे पालिका शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

First Published on December 6, 2018 2:40 am

Web Title: gate at the end of juinagar