23 November 2017

News Flash

रस्त्यातील खड्डय़ांमुळे तरुणीचा बळी

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बांधणवाडी गावानजीक ही घटना घडली.

प्रतिनिधी, पनवेल | Updated: September 9, 2017 5:44 AM

अपघातात तरूणीच्या मृत्यूनंतर नागरिकांनी महामार्गावर रास्ता-रोको केले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे वारंवार अपघात होण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालविणारी एक तरुणी ठार झाली आहे. घणसोली येथे राहणारी भाग्यश्री शिंदे असे या मृत तरुणीचे नाव आहे. कंटेनरचालकास अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बांधणवाडी गावानजीक ही घटना घडली. पेण येथे आपल्या मैत्रिणीकडे मुक्कामी गेलेली भाग्यश्री घरी परतत असताना हा अपघात झाला. पेणहून पनेवलच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करताना महामार्गावरील खडीमध्ये भाग्यश्रीची दुचाकी घसरली.  कंटेनर भाग्यश्रीच्या डोक्यावरून गेला. यामध्येच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.

अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे वाहतूक दीड तास ठप्प झाली होती.

First Published on September 9, 2017 5:44 am

Web Title: girl died at mumbai goa highway due to pothole