10 April 2020

News Flash

सरकारी कार्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक’ हजेरी

बायोमॅट्रिक पद्धतीने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची हजेरीची पद्धत सुरू केली आहे.

कामाच्या प्रत्येक मिनिटाचे गणन

पनवेल : सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी किती वेळ काम केले आणि त्यानुसार यापुढे वेतन देण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्य़ातील उपविभागीय कार्यालये आणि महसूल विभागातील तहसील कचेऱ्यांमध्ये तातडीने ‘बायोमॅट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्य़ामधील उपविभागीय कार्यालयांमध्ये व महसूल कचेऱ्यांमध्ये मागील वर्षभरापासून बायोमॅट्रिक पद्धतीने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची हजेरीची पद्धत सुरू केली आहे. याच पद्धतीमुळे कर्मचारी प्रत्यक्षात किती वाजता कार्यालयात ये-जा करतात याची अचूक नोंद जिल्हा सामान्य प्रशासनाकडे नोंदविली जाते. जिल्ह्य़ातील ३२ ठिकाणे बायोमॅट्रिक यंत्र लावली असली तरी यातील अनेक ठिकाणी ही यंत्र बंद व नादुरुस्त होती. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास अचूकपणे नोंदले गेले नव्हते. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी आठवडय़ातील पाच दिवस कामाचे जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बायोमॅट्रिक यंत्र तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्य़ाचे उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी याबाबत लेखी आदेश प्रत्येक उपविभागीय कार्यालयाला तातडीचे जाहीर केले आहेत.

या आदेशानुसार मार्च २०२० पासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची कामाची येण्याची व जाण्याची वेळ बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदविली जावी तसेच याच पद्धतीने बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थिती ग्राह्य़ धरली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी बैनाडे यांच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:12 am

Web Title: government office biometric attendance akp 94
Next Stories
1 मतदार याद्यांचे शुद्धीकरण मंदगती
2 नवी मुंबईत गणेश नाईकांच्या गडाला सुरुंग?
3 अल्प उत्पन्न गटातील गृहधारकांकडून सिडकोची जबर वसुली
Just Now!
X