07 July 2020

News Flash

‘एपीएमसी’त यंदा धान्याची आवक निम्म्यावर

टाळेबंदीनंतरही बाजारभाव अद्याप स्थिर

संग्रहित (एक्स्प्रेस फोटो - अमित चक्रवर्ती)

टाळेबंदीनंतरही बाजारभाव अद्याप स्थिर

नवी मुंबई :  वाशीतील मुंबई कृषीउत्पन्न  धान्य बाजार समितीत मार्च आणि एप्रिल दरम्यान नवीन शेत मालाची आवक सुरू होते. मात्र यंदा गत वर्षीच्या तुलनेत ५०टक्के  शेतमालाच्या आवकीत घट झाली आहे.  मार्च, एप्रिल व मे २०१९ च्या तुलनेत मार्च, एप्रिल, मे  २०२० मध्ये गहू, ज्वारी, तांदूळ या शेतमालाची आवक घटली आहे.  मात्र, बाजारभाव अद्याप स्थिर असल्याची माहिती धान्य बाजार समितीने दिली आहे.

एपीएमसी धान्य बाजारात मुखत्वे गहू, तांदूळ, ज्वारी त धान्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत असते. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व सेवा गेल्या दोन तीन महिन्यांपासून ठप्प होत्या, मात्र अन्नधान्य हे जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडत असून एपीएमसी बाजार ही समाजिक अंतर तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवून सुरू आहे. मात्र टाळेबंदीने परराज्यातील वाहतूक तुरळक प्रमाणात असून टाळेबंदीने वाहतुकीत बऱ्याच अडचणी होत्या. तसेच बाजारात नित्याने दाखल होणाऱ्या गाडय़ांवर मर्यादाही घालून देण्यात आली आहे. आधी ३५० गाडय़ा आवक होत असून टाळेबंदी दरम्यान ३०० गाडी दाखल होईल, असा नियम करण्यात आलेला आहे. तसेच या करोनाकाळात एक दिवस मालाची ‘लोडिंग’  तर एक दिवस ‘अनलोडिंग’असे नियम घालून दिले आहेत. त्यामुळे या सर्व कारणांमुळे शेतमालाची आवक घटली आहे. मार्च १५ नंतर टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यात आवकीत मोठया प्रमाणावर फरक पडला नसून  मार्च २०१९मध्ये ४ लाख ६ हजार ५४४ क्विन्टल तर मार्च २०२० मध्ये तीन लाख ६३ हजार ५२८ क्विन्टल तसेच एप्रिल आणि मे महिन्यात कडककीत बंद ठेवल्याने या दोन महिन्यांत आवकीत मोठया प्रमाणात घट झाली आहे.

घट अशी..

* एप्रिल २०१९ मध्ये १९ लाख २३ हजार ४२८ क्विन्टल, तर एप्रिल २०२० मध्ये नऊ लाख ५ हजार ७२९ क्विन्टल मे २०१९ मध्ये १२ लाख १३ हजार ३३८ तेच मे २०२० मध्ये सात लाख  ९५ हजार ८४० क्विन्टल

* जून २०१९मध्ये ८ लाख ३२ हजार ७२४ क्विन्टल तर २२जून २०२० पर्यंत ४ लाख ६३ हजार २८१ क्विन्टल आवक झाली आहे.

दर असे..

* प्रतिक्विन्टल सरासरी गहू २५००, तांदूळ ३६००, ज्वारी ३६००, बाजरी २८००रु  चणाडाळ ५२०० रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 3:15 am

Web Title: grain arrivals at apmc market with half of the capacity this year zws 70
Next Stories
1 नवी मुंबईतील करोनाबाधितांनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा
2 नवी मुंबईत आज २२४ नवे करोनाबाधित, पाच रुग्णांचा मृत्यू
3 मोठी बातमी! नवी मुंबईत कडक लॉकडाउन जाहीर
Just Now!
X