एपीएमसी घाऊक बाजारात कमी होत असल्याने हिरवी मिरची महागली आहे. घाऊकमध्ये पंधरा ते वीस रुपये दरवाढ झाली असून ४० ते ५० रुपये किलो झाली आहे. किरकोळ बाजारात दुप्पट दराने विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक येथून हिरवी मिरची दाखल होत असते. सध्या बाजारात १५ ते २० टक्के आवक घटली आहे. मात्र मागणीनुसार पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वधारले असल्याने किरकोळ बाजारातदेखील ८० ते १०० रुपयांवर विक्री होत आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आवक कमी होत आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याची पन्नाशी

वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून गेल्या महिन्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो ३५-४० रुपयांवर असलेला कांदा आता ४५ते ५० रुपयांवर गेला आहे. तर किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये रुपयांवर विक्री होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे तर जुना साठवणुकीचा कांदा खराब निघत आहे, त्यामुळे आवक कमी होत असून किमतीत वाढ झाली आहे. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते मात्र पावसामुळे ते लांबले. बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास विलंब होणार असून  डिसेंबपर्यंत दरात तेजी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.