X
X

ढोल ताशे, लेझीमचा ताल.. रथांची शोभा!

READ IN APP

ढोल ताशांच्या गजरात,लेझिमच्या तालावर व रथावरील चलचित्राच्या स्पर्धासह शोभा यात्रेचे आयोजन केले होते.

उरण शहरातून गुढी पाडव्याच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात,लेझिमच्या तालावर व रथावरील चलचित्राच्या स्पर्धासह शोभा यात्रेचे आयोजन केले होते.या शोभा यात्रेत ज्येष्ठ नागरीक महिला,विद्यार्थीनी,राजकीय नेते सहभागी झाले होते. शोभा यात्रेच्या मार्गावर स्वागतासाठी विविध ठिकाणी मोठमोठय़ा रांगोळ्या काढलेल्या होत्या. महिलांनी पारंपारीक वेशभूषा करून सहभाग घेतला होता. यात्रेची सुरूवात आणि समारोप पेन्शनर्स पार्क येथे झाला.
यंदा युथ फेस्टीवल फोरम च्या तरूणांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला होता. शोभायात्रेत सर्वप्रथम एन.आय. हायस्कूलचे लेझिम पथक होते. त्यानंतर ढोलताशा पथक होते.तर ज्येष्ठ नागरीक,महिला,विद्यार्थी,राजकीय नेते विविध देव देवतांचे रूप घेतलेले हौशी नागरीक सजवलेल्या रथा मध्ये होते.तर एक महिला घोडय़ावर स्वार झालेली होती.
शोभा यात्रेत नागरीकही मोठय़ा संख्येने सहभागी झालेले होते.तसेच लहानग्यांनी या शोभा यात्रेत सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.उरण शहरातून वाजत गाजत निघालेली शोभा यात्रा पाहण्यासाठी उरण मधील नागरीकांनीही गर्दी केली होती.यावर्षीच्या शोभा यात्रेत तरूणांनी सहभाग घेतल्याने उरण मध्ये यावर्षीची शोभा यात्रा मोठी होती.

22
X