25 September 2020

News Flash

पाणी, पर्यावरणाचा झंकार..

जल्लोषपूर्ण वातावरणात ढोलताशांचा कडकडाट घुमला. या ठेक्यावर ध्वजपथकांतील झेंडे वाऱ्यावर लहरत होते.

गुढीपाडव्याच्या निमित्त नवी मुंबईतील शहरामध्ये ठिकठिकाणी पालखी मिरवणूक निघाली.

नवी मुंबईत पालखी मिरवणूक, शोभायात्रांनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्त नवी मुंबईतील शहरामध्ये ठिकठिकाणी पालखी मिरवणूक निघाली. विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. शोभायात्रेत सामाजिक संदेशाबरोबरच, झांज, लेझमी पथकातून पाणी बचत आणि पर्यावरण सुरक्षेचा झंकार आसमंतात उमटला.
जल्लोषपूर्ण वातावरणात ढोलताशांचा कडकडाट घुमला. या ठेक्यावर ध्वजपथकांतील झेंडे वाऱ्यावर लहरत होते. हलगीच्या आणि ताशांच्या नादावर लेझीमपथकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा वारसा जपत टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला. स्वागतासाठी चौकाचौकांत तसेच सोसायटय़ांमध्ये रांगोळया काढण्यात आल्या होत्या. पुरुषांच्या डोक्यावर फेटे दिमाखात होतेच, यात महिलाही मागे नव्हत्या. तरुणाईच्या जल्लोषात ज्येष्ठांनीही ताल धरला होता. नऊवारी साडय़ा परिधान केलेल्या महिलांनी दुचाकीवरुन फेरफटका मारला.
मराठी माणसाचा आनंदोत्सव अशी गुढीपाडव्याची ख्याती. मराठी संस्कार, संस्कृती, पंरपरा यांचा त्रिवेणी संगम. त्याचे जतन करणे ही काळाची असून त्यासाठी मराठी अस्मिता, मराठी अभिमान हे भावी पिढीला समजण्यासाठी शहरात ठिकठिकाणी शोभयात्रा काढण्यात आल्या. यावेळी राज्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती पाहता शोभायात्रामध्ये पाणी बचतीव्चा संदेश देण्यात येऊन सामजिक संदेश देखील शोभायात्रेतून देण्यात येत होते.

ऐरोली सेक्टर २ येथील सिध्दीगणेश मंदिर संस्कार भारती ऐरोली समिती, ज्ञानदीप ग्राहक संघ व नादगर्जा ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पाणी बचतीवर बच्चे कपंनी कडून पथनाटय सादर करुन जागर केला. श्री सिध्दीविनायक मंदिर विश्वसत मंडळ, ऐरोली च्या वतीने देखील शोभायात्रे सह पालखी मिरवणुक काढयात आली. घण्सोली कॉलनी सेक्टर ५ मधील ज्येष्ठ नागरिक संस्था आणि प्रशांत पाटील मित्र मंडळ यांच्या नृत्वाखाली गुडी उभारुन शोभायात्रा काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महारजांची सजविलेल्या रथातून घोडय़ावरून मावळयांच्या उपस्थितीत भगवे फेटे बांधून पायी चालत मिरवणुक काढली.
यावेळी स्त्री भ्रुण हत्या राखेण, सुपंर्ण देश पोलीओ मुक्त करण्यासाठी महिलांनी जनजागृती करत घोषण दिल्या. अखिल सानपाडा रहिवाशी संघाच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली. तर लेझीमच्या ठोक्यावरील खेळ हे यंदाच्या स्वागतयात्रेत विशेष आकर्षण ठरणार आहे. वाशीतील शिवाजी चौकात भव्य स्वागत यात्रा काढयात येऊन पाणी बचतीवर शपथ घेण्यात आली. सीवुड येथील छोटे-मोठे सर्व मंडळे एकत्र सहभागी होऊन भव्य अशी शोभायात्रा काढणार आहे. जुई गावातील गावदेवी मरीआई मंदिरापासून शिवाजी चौकापर्यत ही स्वागत यात्रा काढण्यात आली. त्यामध्ये विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते. शोभायात्रामध्ये मराठ मोळया पध्दतीने हिदू नवर्षांची स्वागत करण्यासाठी नवी मुंबई मधील ढोल पथकही ढोल कमरेल बांधून ढोल ताशाचा गजर करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:52 am

Web Title: gudipadwa celebrations with social messages at navi mumbai
Next Stories
1 हापूसच्या गोडीला ‘टंचाई’चा डाग; ‘एपीएमसी’त भाव मात्र स्थिर
2 पनवेलमधील बेकायदा बांधकामांवर पालिकेचा हातोडा
3 पालिका पाणी बचत यंत्र बसविणार
Just Now!
X