24 October 2020

News Flash

तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा संयमाचीच तयारी

नव्याने टाळेबंदीच्या निर्णयाने केशकर्तनालये, ब्युटी पार्लर व्यवसायाला खीळ

(संग्रहित छायाचित्र)

नव्याने टाळेबंदीच्या निर्णयाने केशकर्तनालये, ब्युटी पार्लर व्यवसायाला खीळ

नवी मुंबई : तीन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर नवी मुंबईत उघडण्यात आलेली केशकर्तनालये आणि सौंदर्य वर्धन  दुकानचालकांचा आनंद औट घटकेचा ठरला. शहरात बहुतांश ठिकाणी नव्याने टाळेबंदी लागू झाल्याने हा व्यवसाय आरंभाआधीच आटोपता घ्यावा लागला. त्यातही ज्या ठिकाणी टाळेबंदी नाही, त्या ठिकाणी आशादायी व्यवसाय होण्याची शक्यताही दुरावली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ नुकसान सोसून नव्याने उभारलेल्या केशकर्तनकारांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आहे.

टाळेबंदीच्या काही नियमांत शैथिल्य आणल्यानंतरही  केशकर्तनालये आणि सौंदर्य वर्धन  दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. ग्राहकाशी नजीकचा संपर्क असल्याने परवानगी नाकारण्यात आली होती. राज्यातून विविध ठिकाणांहून नाभिक समाजाच्या संघटनांच्या मागण्यांकडे  सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. मात्र, शनिवारी झालेल्या निर्णयानुसार नियम आणि अटींचे पालन करून व्यवसाय सुरु करण्याची मुभा देण्यात आली. प्रत्येक ग्राहकांनंतर खुर्ची आणि वापरलेल्या वस्तूचे निर्जंतुकीकरण ग्राहक आणि सेवा देणाऱ्या कर्तनकाराने दोघांनाही मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय  जंतुनाशकांचा उपयोगही अनिवार्य करण्यात आला होता.

मात्र, करोना संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने नव्याने टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच दिवसाच्या व्यवसायावर केशकर्तनकारांना दुकाने बंद ठेवावी लागली.

मंगळावरपासून नवी मुंबईतील अन्य दोन ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे येत्या ५ जुलैपर्यंत केशकर्तनालये आणि सौंदर्य वर्धन दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. कारागीरांच्या हाताला पुन्हा काम नसल्याने नव्याने आर्थिक गणित मांडावे लागणार आहे.

पुन्हा तेच

* नव्याने लागू केलेली टाळेबंदी उठल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठीच्या अनेक उपायांमधील काही उपाय नव्याने करावे लागणार आहे. आधीच या साऱ्या गोष्टींवर मोठा खर्च झाला आहे.

* परराज्यांत गेलेले काही रोजगाराच्या आशेने पुन्हा नवी मुंबईत परतल्याने त्यांचा खर्च द्यावा लागला आहे. त्यांनीही नव्याने उमेदीने कामाला लागण्याची तयारी केली होती. आता ते पुन्हा नवा पेच आहे.

२७ जून रोजी आम्ही नव्या जोमाने तयारी केली होती. मात्र, अवघ्या एका दिवसात सारे काही बदलले आहे.

-नरेंद्र गायकर, अध्यक्ष नाभिक संघटना

लग्नाचा मौसम हातचा गेलाच आहे. २७ जून आधी थोडी आशा निर्माण झाली होती. आता संयमाशिवाय दुसरे आमच्याजवळ काही नाही.

-कीर्ती बेंडारे, ब्युटीशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:56 am

Web Title: hairdressers beauty parlor business stalled due to new lockdown zws 70
Next Stories
1 वाशी बसस्थानक प्रकल्पाचे काम लांबणीवर नाही
2 तुर्भेप्रमाणे लवकरच शहरभर समूह तपासणी
3 करोनाविरोधातील लढय़ाला खासगी साथ
Just Now!
X