26 February 2021

News Flash

हापूसचे दर उतरले

जानेवारीपासून एपीएमसी बाजारात हापूसची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक तुरळक होती.

२ हजार १०० पेट्यांची आवक;  पेटी २५०० ते ४५०० रुपयांना

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात गेल्या महिन्यापासूनच हापूसची तुरळक आवक होत आहे. आता आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दरही आवाक्यात आले आहेत. मागील आठवड्यात हापूसच्या ५ ते ७ डझनची पेटी ४ ते ७ हजार रुपयांना होती ती आता २५०० ते ४५०० रुपयांना विकली जात आहे.

समाधानकारक पाऊस झाल्याने हापूसचे चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा या वर्षी होती. मात्र हवामान बदल व अवकाळी पावसाचा हापूस पिकाला फटका बसला असून या वर्षी ३० ते ४० टक्केच हापूसचे उत्पादन निघेल असा आंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हापूसची चव या वर्षी थोडी महागात पडण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासून एपीएमसी बाजारात हापूसची आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक तुरळक होती. त्यामुळे हापूसचे दरही जास्त होते. घाऊक बाजारात ५ ते ७ डझनची पेटी ४ ते ७ हजार रुपयांना होती. त्यामुळे किरकोळ बाजारातही दर चढे होते.  बाजारात आता हापूसची आवक वाढली आहे. मंगळवारी फळबाजारात २ हजार १०० पेट्यांची आवक झाली आहे. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या ग्राहकांची संख्या एपीएमसीत रोडावली आहे. त्यामुळे हापूसला मागणी कमी आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले आहेत. ५ ते ७ डझनची पेटी आता २५०० ते ४५०० रुपयांना विकली जात आहे.

तसेच हापूस परिपक्व होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ग्राहक खरेदी करण्यास हात आखडता घेत आहेत. कचरत आहेत. मात्र १० एप्रिलनंतर बाजाराला पुन्हा चालना मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी हापूसची आवक फळबाजारात देवगड, राजापूर, वेंगुर्ले येथील हापूसची आवक होत आहे. बाजारात २ हजार पेट्या दाखल होत आहेत. यापैकी रत्नागिरीच्या हापूसचे प्रमाण ५ टक्के इतके आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:03 am

Web Title: hapus mango rate hapus rates dropped akp 94
Next Stories
1 हरकतींचा पाऊस
2 मगर पिंजऱ्यात
3 नवी मुंबईतही कडक निर्बंध?
Just Now!
X