News Flash

‘कॉर्पोरेट पार्क’मध्ये ‘रग्बी’ खेळविणार

खारघर नोडला स्पोर्टस सिटी बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून चार फुटबॉल मैदाने विकसित केली जाणार आहेत.

 

दोन मैदानांत सिडको नियोजन;  खारघर नोडला स्पोर्टस सिटी बनविण्याचा प्रस्ताव

नवी मुंबई : अडगळीत पडलेल्या खारघरमधील गोल्फ कोर्सला संजीवनी दिल्यानंतर सिडकोने याच भागात कॉर्पोरेट पार्कमध्ये चार फूटबॉल मैदाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दोन मैदानावर रग्बी हा खेळ खेळविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात खारघरमध्ये हात, पाय, डोकं, आणि तोंड याला पॅडिंग लावून खेळणारे २२ खेळाडू रग्बी मैदानावर दिसणार आहेत.

विशेष म्हणजे या खेळाची संकल्पना पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी सुचविली आहे. भारतात दुर्लक्षित असलेला हा क्रीडा प्रकार जगातील प्रगत देशात मात्र मोठ्या आवडीने खेळला जातो. या खेळात शाररीक शक्ती, कौशल्य आणि तेवढ्याच चपळाईची गरज आहे.

सिडकोने आतापर्यंत शाळा, महाविद्यालयांना खेळाची मैदाने दिलेली आहेत. ही मैदाने नंतर त्या शैक्षणिक संस्थांची मक्तेदारी झालेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना खेळण्यास ही मैदाने देण्यात यावी या अटीचा त्या शैक्षणिक संस्थांनी भंग केल्याचे दिसून येते. त्यानंतर सिडकोने पालिकेला काही मैदाने नाममात्र दराने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. घणसोली येथे एका आंतरराष्ट्रीय संकुलासाठी सिडकोने पालिकेला ३६ एकर जमीन दिली आहे पण ती आता खारफुटी नियंत्रण कायद्यात अडकली आहे. त्यामुळे ती या कायद्यातून सोडवून घेण्याची जबाबदारी पालिकेची राहणार आहे. या व्यतिरिक्त सिडकोने क्रीडा विश्वा विकसित करण्यासाठी कोणतीही भूमिका पार पाडलेली नाही. खारघर येथे १०३ एकर जमिनीवर डोंगराच्या पायथ्याशी ५० कोटी रुपये खर्च करून गोल्फ कोर्स विकसित केला आहे, पण या गोल्फ कोर्सला वनविभागाने खोडा घातल्याने त्याकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू फिरकलेले नाहीत. त्यासाठी सिडकोने मागील आठवड्यात या गोल्फ कोर्समध्ये स्पर्धाचे आयोजन केले होते. त्यामुळे काही प्रमाणात गोल्फ खेळाडू या मैदानाकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे.

सिडकोचे व्यवस्थापैकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी खेळांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून अडगळीत पडलेल्या गोल्फ कोर्सला पुन्हा संजीवनी दिली आहे. खारघर नोडला स्पोर्टस सिटी बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून चार फुटबॉल मैदाने विकसित केली जाणार आहेत. यातील दोन मैदाने हे खास करुन रग्बी फुटबॉल खेळासाठी राखीव ठेवली जाणार असून देश विदेशातील  खेळाडू या मैदानावर आपल्या खेळांचे प्रर्दशन करावे यासाठी सिडको प्रयत्न करणार आहेत. मुंबई व पुणे रग्बी संघ यासाठी उत्सुक राहणार आहेत. यासाठी इंग्लंडच्या फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल (फिफा) या शंभर वर्षे जुन्या फुटबॉल संघटनेचे सहकार्य घेतले जाणार आहे. हा खेळ भारतात कमी खेळला जात असून सिडकोने त्याचा विकास करण्याचे ठरविले आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

सिडकोच्या दक्षिण भागाचे महत्त्व वाढणार आहे. विमानतळ, मेट्रो, गोल्फ, यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाबरोबर रग्बी सारखा आंतरराष्ट्रीय खेळाला महत्त्व दिले जाणार असून त्यासाठी मैदाने विकसित केली जाणार आहेत. यामुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईचे वेगळेपण अधोरिखित होणार आहे. – डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापैकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:02 am

Web Title: he will play rugby in a corporate park akp 94
Next Stories
1 मतदारांच्या नावात फेरफारासाठी आर्थिक व्यवहार
2 रिक्षा वाहतुकीत बेपर्वाई
3 हापूसचे दर उतरले
Just Now!
X