24 January 2020

News Flash

पावसामुळे भाजीपाला, फळांची आवक घटली

सध्या बाजारात राज्यातून सीताफळ, डाळिंब, पपई या फळांचा हंगाम सुरू आहे.

नवी मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम ‘एपीएमसी’त आवक होणाऱ्या शेतमालावरही झाला आहे. भाजीपाला व फळांची आवक निम्म्याने घटली. मात्र ग्राहक कमी असल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला नाही. मात्र आवक अशीच कमी राहिली तर शेतमालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी बाजारात मोठय़ा प्रमाणात शेतमालाची आवक होत असते. पावसामुळे आवक कमी झाली. सोमवारी ६०० ते ७०० गाडय़ांची आवक होत असते, मात्र आज बाजारात अवघ्या ४०० गाडय़ा दाखल झाल्या. भाजीपाला बाजारात पुणे, नाशिक येथून मोठय़ा प्रमाणात शेतमालाची आवक होत असते. मात्र आज बाजारात येथून कमी आवक झाली. मात्र सोलापूरहून जास्त भाजीपाला दाखल झाल्याचे घाऊक भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे यांनी सांगितले. पावसामुळे मुंबई, उपनगरातील ग्राहकही कमी होते, त्यामुळे बाजारभावावर मात्र काही परिणाम झाला नाही.

फळबाजारात सोमवारी ३०० ते ३५० गाडय़ा माल येतो. मात्र आज २०० गाडय़ा आवक झाली. पन्नास टक्के फळांची आवक घटली. सध्या बाजारात राज्यातून सीताफळ, डाळिंब, पपई या फळांचा हंगाम सुरू आहे. तर परराज्यातून उत्तर प्रदेश, हिमाचलमधून सफरचंद, प्लम, पिच, पेर या फळांचा हंगाम सुरू असल्याचे व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले. फळांचे बाजार भावही स्थिर आहेत. येत्या दोन दिवसांत आवक वाढेल असे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. सीताफळ ४० ते १५० रुपये प्रतिकिलो, पपई ३० ते ३५ रुपये, डाळिंब ५० ते २०० रुपये तर पेर ५० ते ८० रुपये प्रतिकिलोचे बाजारभाव होते. कांदा बटाटा बाजार १०० गाडय़ांची आवक झाली असून यामध्ये ४० गाडय़ा बटाटा दाखल झाला आहे. आवकीवर परिणाम झाला नसल्याचे व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले.

भाजीपाला

६०० ते ७०० गाडय़ांची आवक होत असते, मात्र अवघ्या ४०० गाडय़ा दाखल झाल्या.

फळे

३०० ते ३५० गाडय़ा माल येतो. मात्र २०० गाडय़ा आवक झाली.

First Published on August 6, 2019 3:28 am

Web Title: heavy rainfall reduced supply of vegetables and fruits zws 70
Next Stories
1 राष्ट्रवादीची धडपड
2 मोरबेत येत्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
3 शहरबात : पक्षांतराचे परिणाम
Just Now!
X