13 August 2020

News Flash

रुग्णवाढ नियंत्रणासाठी मुंबईतील डॉक्टरांची मदत

डॉ. गिरीष राजाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील सहा डॉक्टरांच्या सल्लागार समितीचे रुग्णवाढीवर लक्ष

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. गिरीष राजाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील सहा डॉक्टरांच्या सल्लागार समितीचे रुग्णवाढीवर लक्ष

नवी मुंबई : पालिकेने मुंबईतील काही निष्णात डॉक्टरांची मदत घेतली असून ही संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मार्च महिन्यात नायर रुग्णालयाचे डॉ. गिरीष राजाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईसाठी स्थापन करण्यात आलेली सहा डॉक्टरांची सल्लागार समिती या रुग्णवाढीवर लक्ष देऊन आहे. याशिवाय अनेक डॉक्टरांना पालिकेच्या पथकावर आमंत्रित केले जात आहे. मुंबई, नवी मुंबईतील डॉक्टरांची ही समिती कोविड रुग्णांच्या संर्दभात उपचार आणि समन्वय साधणार आहे.

वाशी, ऐरोली, ठाणे, शिळफाटा आणि पनवेल असे पाच प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या सात हजाराच्या घरात गेली असून येत्या काळात ती लवकरच दहा हजाराचा टप्पा गाठणार असल्याचे आरोग्य विभागाचा निष्र्कष आहे. फिलिपाईन्स मधून आलेले एका धर्म प्रचाराकांमुळे नवी मुंबईत आठ मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईत ये जा करणारे शासकीय व डॉक्टर यांच्यामुळे ही संख्या नतंर वाढली आणि एपीएमसी बाजारातील प्रार्दुभावामुळे त्यात भर पडली. एपिल मधील पाचशेची संख्या आता दहा हजाराच्या जवळ जात आहे. त्यामुळे पुन्हा दहा दिवसाची कठोर टाळेबंदी पालिकेला लागू करावी लागली आहे. नवी मुंबई पालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. डॉक्टर अधिकाऱ्यांचे आपआपसातील मतभेद आणि समन्वयाच्या अभावी गोंधळ आरोग्य सेवेत निर्माण होत आहे. आरोग्य विभागाविषयी अनेक तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. ठाण्यातील शिंदेशाहीचा वरदहस्त असलेले वैद्यकिय अधिकारी बाळासाहेब सोनावणे हे सहकारी डॉक्टरांचे दूरध्वनी उचलत नाहीत अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी साथ रोग नियंत्रण कायद्याचा वापर करुन शहरातील करोना रुग्णांवर उपचारासाठी नायर रुग्णालयाचे डॉ. गिरीष राजाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली के. ई. एम रुग्णालयाचे डॉ. गजानन वेल्हाळ, एम. जी. एम रुग्णालयाचे डॉ. उदय जाधव, कमलेश रुग्णालयाचे डॉ. उपेंद्र किंजवडेकर, अपोला रुग्णालयाचे कंन्सटंट डॉ. अक्षय छलानी, एमजीएम महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. जेसी एलिझाबेथ या सहा निष्णांत डॉक्टरांची एक सल्लागार समिती यापूर्वीच स्थापन केली आहे.

राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापलेली आहे. नवी मुंबई पालिकेनेही यापूर्वीच अशा प्रकारची निष्णात डॉक्टरांची सल्लागार समिती स्थापन केली आहे. मुंबईतील अनेक डॉक्टरांची नवी मुंबईसाठी मदत घेत आहोत.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:01 am

Web Title: help from doctors in mumbai for coronavirus control zws 70
Next Stories
1 खासगी रुग्णालयांतील खाटा आरक्षित ठेवा
2 नवी मुंबई : तळोजा वसाहतीसमोरील ६० कोटी रुपये खर्चुन बांधलेला भुयारी मार्ग पाण्याखाली
3 नवी मुंबई : शहरात करोनाचे २५७ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू
Just Now!
X