शीव-पनवेल महामार्गावर तुर्भे उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूने असलेली पाऊलवाट आता वाहतुकीचा रस्ता झाला असून येथून वाहने महामार्गावर प्रवेश करीत आहेत. हा बेकायदा रस्ता धोकादायक बनला आहे. या ठिकाणी नेहमी छोटेमोठे अपघात होत आहेत. रविवारी येथे झालेल्या विचित्र अपघातात तिघे जण गंभीर जखमी असून त्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी दुपारी शीव-पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर जुईनगर येथे हा अपघात झाला. भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस इको गाडीला डावीकडे घासून गेली. यामुळे याच ठिकाणी उभ्या असलेल्या डंपरमुळे इको गाडीला स्वत:चा बचाव करता आला नाही. या अपघातात इको गाडीतील तिघे जण (पान ३ वर)

या ठिकाणी १० पदरी शीव-पनवेल महामार्गाचे विस्तारित काम करण्यात येणार आहे. त्या वेळी हा बेकायदा रस्ता आपोआप बंद होणार आहे. मात्र तोपर्यंत दुर्घटना टाळण्यासाठी तारेचे कूंपण लवकरात लवकर घातले जाईल.

– मनोज पाटील, अभियंता, तुर्भे विभाग