नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २३ हजारांच्याही पुढे गेली आहे. शहरात आज ३९८ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहे.
वाढत्या संसर्गामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या २३ हजार ५ वर पोहचली आहे. शहरात आज ६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५३७ झाली आहे. शहरात आतापर्यंत १८ हजार ९५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरात आतापर्यंत एकूण १,१०,४९५ जनांच्या चाचण्या करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर ८२ टक्के झाला आहे.
राज्यात आज १४ हजार ४९२ करोनाबाधितांची वाढ झाली तर २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६ लाख ६१ हजार ९४२ वर पोहचली असून ४ लाख ८० हजार ११४ जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६९ हजार ५१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.४५ टक्के झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 9:05 pm