पनवेलच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) महाविद्यालयामध्ये ५ डिसेंबरला सकाळी दहा वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सरकारच्या कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पनवेल कार्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे.
पनवेल परिसरातील विविध कंपन्यांची प्रतिनिधी येथे रिक्त पदांच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी हजर राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदवीधर, आयटीआय (फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, एओसीपी, डीजी पंप, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, डिप्लोमा, बीई मॅकेनिकल) प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्जही करण्याचीही सुविधा आहे.
सरकारच्या महारोजगार वेबसाइटवरून जॉबफेअर टॅबमध्ये जॉबफेअर इव्हेंट- रायगड डिस्ट्रिक्ट – रोजगार मेळावा पनवेल येथे अर्ज करता येतील. या साइटवर रिक्त पदे आणि इतर माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी ४ डिसेंबपर्यंत या साइटवर अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला येताना शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र व दोन छायाचित्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Traffic jam, Kalyan Dombivli,
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप